धक्कादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक..चारशेचा आकडाही ओलांडला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

नाशिकच्या बजरंग वाडीतील गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी कॅनडा कॉर्नर परिसरातील 75 वर्षीय महिला, गंगापूर परिसरातील 55 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर देवळाली परिसरातील 7 इसम पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिंगवेबहुला, भगूर रोडवरील दोघांसह देवळलीतील सहा जवान आहेत. तर येवल्यातील 16 जण आणि मालेगावात पुन्हा 17 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 5 पोलीस जवान आहेत.

नाशिक : जिल्ह्याने मंगळवारी (ता5) सायंकाळपर्यंत 5 तर रात्री उशिरापर्यंत आलेले 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे चारशेचा आकडाही ओलांडला. यामुळे जिल्ह्यात 425 कोरोनाचे रुग्ण झाले असून जिल्ह्यात अन्य शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. प्रामुख्याने देवळाली कॅम्प परिसरात 7, नाशिकमध्ये सकाळी एक आणि सायंकाळी 2 तर, मालेगावात 17, येवल्यात 16, तर सटाण्यात पहिला असे दिवसभरात 47 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवसभरात 47 नवीन रुग्ण : नाशिकसह येवला, सटाणा, मालेगावात नवीन रुग्ण
नाशिकच्या बजरंग वाडीतील गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी कॅनडा कॉर्नर परिसरातील 75 वर्षीय महिला, गंगापूर परिसरातील 55 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर देवळाली परिसरातील 7 इसम पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिंगवेबहुला, भगूर रोडवरील दोघांसह देवळलीतील सहा जवान आहेत. तर येवल्यातील 16 जण आणि मालेगावात पुन्हा 17 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 5 पोलीस जवान आहेत.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crossed four hundred corona patient in nashik district marathi news