esakal | लॉकडाउनच्या भीतीने रेल्वेस्थानकावर गर्दी; आरक्षण, चौकशीसाठी मोठ्या रांगा 
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Road Railway Station

कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनचा अंदाज पाहता नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी वाढत असून, आरक्षणासाठीही रांगा लागल्या आहेत. 

लॉकडाउनच्या भीतीने रेल्वेस्थानकावर गर्दी; आरक्षण, चौकशीसाठी मोठ्या रांगा 

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : येथील रेल्वेस्थानकावर गेले पंधरा दिवसांपासून कोरोना चाचण्या बंद आहेत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा करार संपल्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी गत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनचा अंदाज पाहता नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी वाढत असून, आरक्षणासाठीही रांगा लागल्या आहेत. 

१५ दिवसांपासून कोरोना चाचण्या बंद

१५ दिवसांपासून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कोरोना चाचण्या बंद आहेत. परराज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तापमान तपासणी व संशयित रुग्णांच्या तपासण्या होत नाहीत. पंधरा दिवसांपासून शहरात आलेल्या लोकांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्या मुळे नाशिक रोड रेल्वस्थानकाच्या माध्यमातून नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

स्थानकावर चौकशीसाठी भली मोठी रांग

पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने लॉकडाउन होते की काय, असा प्रश्न परप्रांतीय मजूर कामगार व रहिवाशांना सतावत आहे. परप्रांतीय रहिवासी नाशिकमध्ये सध्या संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या आरक्षण व चौकशीसाठी सध्या तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. आरक्षणासंबंधी चौकशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक चारजवळ पाहायला मिळत आहे. परप्रांतीयांचे कुटुंब आता पुन्हा स्थलांतरित होते की काय, अशी शक्यता आहे. स्थानकावर चौकशीसाठी भली मोठी रांग लागलेली आहे. अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करण्याच्या तयारीत असून, त्यांना रेल्वेस्थानकावर तिकीट निरीक्षक आडवत आहेत. 

पंधरा दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा करार संपलेला आहे. त्यामुळे तपासणी करण्याकरिता कर्मचारी उपलब्ध नाहीत. 
-डॉ. जितेंद्र धनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, नाशिक रोड 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ