esakal | वीजबिल आले नाही म्हणून होते बिनधास्त..नंतर बसला जबरदस्त शॉक! कसा ते वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

relax at home.jpg

कोरोनामुळे देशात 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि सर्व उद्योगधंदे थांबले. अनेकांवर घर थांबण्याची वेळ आली. यावेळी शासनाने नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून कर्जाच्या हफ्त्यास तीन महिन्याची मुदतवाढ दिली. राज्यातही वीजवितरण कंपनीतर्फे वीजबिलांचे वाटप झाले नाही. तर रिडींग घेण्यास कर्मचारी आले नाही. त्यामुळे ते अगदी बिनधास्त होते..पण त्यानंतर....​

वीजबिल आले नाही म्हणून होते बिनधास्त..नंतर बसला जबरदस्त शॉक! कसा ते वाचा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : कोरोनामुळे देशात 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि सर्व उद्योगधंदे थांबले. अनेकांवर घर थांबण्याची वेळ आली. यावेळी शासनाने नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून कर्जाच्या हफ्त्यास तीन महिन्याची मुदतवाढ दिली. राज्यातही वीजवितरण कंपनीतर्फे वीजबिलांचे वाटप झाले नाही. तर रिडींग घेण्यास कर्मचारी आले नाही. त्यामुळे ते अगदी बिनधास्त होते..पण त्यानंतर....

लॉकडाऊनमधील अधिकचा वापर भोवला

मात्र तीन महिन्यानंतर वीजबील आल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला असून त्या तीन महिन्यातील अतिरिक्त वीजेचा आतिरिक्त वापर भोवला असल्याचे सर्वांच्या मुखी येत आहे. तीन ते पाच हजारांपर्यंत बिल पाहून जिल्ह्यातील ग्राहकांना एकाप्रकारे वीजेचाच धक्का बसला आहे. लॉकडाउन काळातील महावितरणने सरासरी रीडिंगनुसार बिले दिले आहे. मात्र तरी अव्वाच्या- सव्वा बिले पाहून ग्राहक चक्रावत आहे. महावितरणने तीन महिन्यांचे बिल विभागून दिले आहे. या काळात नागरिक घरातच बसून असल्याने विजेचा वापर जास्त झाला. यामुळे हा धक्का सहन करण्याची वेळ आली आहे. मार्च, एप्रिल व मेमध्ये लॉकडाउन व उन्हाळा असल्याने टीव्ही, फॅन, एसी, कुलर सुरू होती. या काळात रीडिंग न घेतल्याने महावितरणने सरासरीनुसार तीन महिन्यांची बिले विभागून दिली. वाढीव बिल असूनही मीटरवरील युनिट तपासले असता, त्यात कुठलीही त्रुटी आढळत नाही. तरीही सर्वांकडून तक्रारींचा सूर निघत आहे. महावितरण बिले बरोबर असल्याचे म्हणत आहे. तीन महिन्यांचे युनिट जूनच्या बिलात विभागून दिल्याने सुरवातीच्या तीन महिन्यांच्या 300 युनिटसाठी तीन रुपये 40 पैसे व त्यापुढील युनिटसाठी सात रुपये 40 पैसे आकारून वीजबिल दिले आहे. 

असे दिले बिल... 
एका ग्राहकाला एप्रिल व मेमध्ये सरासरी 160 युनिटचे बिल दिले. जूनमध्ये त्या ग्राहकाचे मागील (मार्चमधील) रीडिंग 8697 होते व चालू रीडिंग 9347 आहे. म्हणजेच एकूण 650 युनिटचे बिल तीन महिन्यांच्या टप्प्यात तयार झाले. ग्राहकाचे बिल एक महिन्याचे दिले असते, तर आठ हजार 346 रुपये वीजबिल आले असते. ग्राहकाला तीन महिन्यांमध्ये बिल विभागून दिल्यामुळे पाच हजार 520 रुपये बिल देण्यात आले. सरासरी वापर वीज देयक दोन हजार 379 त्यातून वजा केले आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

ग्राहकांचे या बिलात कोणतेही नुकसान नाही. मीटर रीडिंगनुसार आलेले युनिट व त्याचा दर आणि शासनाने लावलेले नियमानुसारच बिले दिली आहेत. सुरवातीच्या 300 युनिटसाठी तीन रुपये 46 पैसे दर लावला असून, सर्व बिले बरोबर आहे. त्यात बदल होणार नाही. शंका असल्यास संपर्क करावा, गर्दी करू नये -  विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता, येवला 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण