मृत व्यक्ती गुन्हा कसा करू शकतो...की हे भुत..? पोलीसांपुढे मोठा प्रश्न

mystery crime.jpg
mystery crime.jpg

नाशिक : पोलिसांच्या लेखी त्याचा केव्हाच मृत्यू झालेला. कोर्टात तसा मृत्यू दाखलाही देण्यात आला होता. पण घरफोड्यांच्या गुन्ह्यात समोर येणारी फिंगर प्रिंट आणि मृत भासवणारा आरोपी याची फिंगर प्रिंट तंतोतत जुळत होती. त्यामुळे मृत व्यक्ती घरफोडी कशी करू शकते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सायबराबाद पोलिस नाशिकमध्ये दाखल झाले होते. 

वकिलामार्फत त्याचा कोर्टात आपलाच मृत्यू दाखला सादर केला
चोरी करत असताना कायद्यापासून बचाव करताना विविध शक्कल चोरांकडून लढवल्या जातात. आडगाव परिसरात राहणारा अशोक नाग्या शिंदे हा त्यापैकीच एक होता. संशयित आरोपी शिंदे सराईत गुन्हेगार असून, तो सातत्याने सायबराबाद आणि हैदराबादमध्ये घरफोडी करायचा. आपले काम आटोपून तो पुन्हा नाशिकमध्ये वास्तव्यास यायचा. सन १९९८ मध्ये शिंदेला सायबराबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. शिंदेने शंभराहून अधिक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. विशेष म्हणजे तो याच भागात गुन्हे करतो. शिंदेच्या अटकेनंतर घरफोडीच्या २४ गुन्ह्यांना उजाळा मिळाला आहे. १९९८ मध्ये शिंदेच्या अटेकनंतर त्याच्यावर खटला सुरू झाला. २००७ मध्ये त्याने वकिलामार्फत कोर्टात आपलाच मृत्यू दाखला सादर केला. यामुळे पोलिसांचा पुढील तपास तसेच खटल्याचे कामकाजही संपले 

त्या फिंगर प्रिंट शिंदेशी जुळायच्या...

सायबराबादमध्ये होणाऱ्या घरफोडीच्या घटनांनंतर तपास करताना पोलिसांना विशिष्ट फिंगर प्रिंट मिळायच्या. या फिंगर प्रिंट शिंदेशी साधर्म्य दाखवयाच्या. मृत व्यक्ती गुन्हा कसा करू शकतो.  की हे काम कोणी भुत करत आहे.. अशा विविध चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या. तरीदेखील गुन्ह्याचा छडा लावायचा असा निश्चय केलेल्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आडगावमध्ये दडून बसलेल्या शिंदेचा माग काढला. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२० ला त्याला अटक करण्यात आली. १४ दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान त्याने दिलेल्या कबुली जबाबानुसार तपास करण्यासाठी २४ फेब्रुवारीला सायबराबाद पोलिस पुन्हा नाशिकमध्ये परतले आहेत..त्यामुळे हे प्रकरण आता कसे वळण घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com