क्रूर नियती.. सिलिंडरचा भीषण स्फोट..संसार आला उघड्यावर..!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य नागरिकांची देव अजून किती परीक्षा घेणार आहे. हे तर अनुत्तरीतच आहे. कारण संकटे काही थांबत नाही..आणि परीक्षा काही सुटत नाही..अशातच नियतीच्या या क्रूर खेळाच्या विळख्यात दापूरचे चव्हाण कुटुंबही सापडले आहे, ​, 

दापुरे येथे सिलिंडरचा स्फोट; 
आगीत पाच लाखांचे नुकसान 

नाशिक / कळवाडी : कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य नागरिकांची देव अजून किती परीक्षा घेणार आहे. हे तर अनुत्तरीतच आहे. कारण संकटे काही थांबत नाही..आणि परीक्षा काही सुटत नाही..अशातच नियतीच्या या क्रूर खेळाच्या विळख्यात दापूरचे चव्हाण कुटुंबही सापडले आहे, 

नियतीचा खेळ काही थांबेना...!

दापुरे (ता. मालेगाव) येथे सोमवारी (ता. 15) दुपारी दोनच्या सुमारास भगवान चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले. संसार उघड्यावर आला आहे. चव्हाण कुटुंब शेतात काम करीत असताना, घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. आग पाहून लोकांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. आगीत 40 क्विंटल बाजरी, 20 क्विंटल मका यांसह साठ हजारांची रोकड, अठरा ग्रॅम सोने, चांदी, टीव्ही, मोबाईल, पंखे, गॅस, भांडी, कपाट, कपडे, कडधान्ये आदी अंदाजे चार लाख 90 हजार सहाशे रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

सुदैवाने जीवीतहानी नाही..

सुदैवाने घरात कुणीही नसल्याने व गुरे, प्राळीव प्राणी घरापासून दूर असल्याने जीवितहानी टळली. गावातील पंचकमिटीने या घटनेचा सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकासमोर पंचनामा केला. ग्रामस्थांनी तातडीने 16 हजार रुपयांची वर्गणी जमा करून भगवान चव्हाण यांच्या स्वाधीन केली.  

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder explosion at Dapure nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: