दीड कोटीच्या विविध कामांना मंजुरी : कृषिमंत्री दादा भुसे 

प्रमोद सावंत
Thursday, 3 September 2020

तालुक्यात जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारतीसह सुमारे एक कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे ग्रामपंचायतीमार्फत सुरू होणार आहेत. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, कामे दर्जेदार व चांगली झाली पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. २) येथे दिले. 

नाशिक / मालेगाव : तालुक्यात जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारतीसह सुमारे एक कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे ग्रामपंचायतीमार्फत सुरू होणार आहेत. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, कामे दर्जेदार व चांगली झाली पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. २) येथे दिले. 

विशेष अनुदानातून मंजूर कामे : 
ग्रामपंचायत इमारती : सातमाने, दसाणे, वडगाव, सावतावाडी, नरडाणे (प्रत्येकी १२ लाख). स्मशानभूमी : सावतावाडी, खाकुर्डी, घाणेगाव, राजमाने, डाबली, वजीरखेडे, चंदनपुरी, चिंचावड (प्रत्येकी पाच लाख). दहनशेड : आघार बुद्रुक (१० लाख). दशक्रिया विधी शेड ः खडकी (५ लाख). स्मशानभूमी वॉलंपाउंड : निमहोळ वस्ती (पाच लाख).

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

शासकीय विश्रामगृहात या कामांच्या कार्यारंभ आदेश वितरणप्रसंगी ते बोलत होते. पाठपुराव्यामुळे तालुक्याला जनसुविधा योजनेंतर्गत कामांना मान्यता मिळाली. या निधीचा सदुपयोग व दर्जेदार कामे महत्त्वाची आहेत. या वेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, रामचंद्र हिरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्यासह विविध गावांचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. 

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dada bhuse said about Sanction for various works nashik marathi news