सावधान.. भीती हेच मृत्यूचे कारण! अखेरच्या क्षणीही जीवाला धोका..

52773032_101.jpg
52773032_101.jpg

नाशिक : बहुतेक कोरोनाबाधित लक्षणे दिसू लागल्यानंतरही डॉक्टरांकडे जात नाहीत. शेजारीपाजारी व परिचित मंडळी बहिष्कार टाकतील या भीतीने लक्षणे लपवितात. परिणामी अखेरच्या टप्प्यात पोचलेला कोरोना 24 किंवा 48 तासांत जीवघेणा ठरतो. म्हणून भीती हेच मृत्यूचे कारण! 

अखेरच्या क्षणी जीवाला धोका
शहरात केवळ 19 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 175 जणांना प्राणवायूचा कृत्रिम पुरवठा केला जात आहे. अशा रीतीने साधारण दोनशेच्या आसपास रुग्ण गंभीर अवस्थेत असताना रोज आठ-दहा जणांचा बळी का जात आहे, सगळ्यांना पडलेला कळीचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर हे की, बहुतेक कोरोनाबाधित लक्षणे दिसू लागल्यानंतरही डॉक्टरांकडे जात नाहीत. शेजारीपाजारी व परिचित मंडळी बहिष्कार टाकतील या भीतीने लक्षणे लपवितात. परिणामी अखेरच्या टप्प्यात पोचलेला कोरोना 24 किंवा 48 तासांत जीवघेणा ठरतो.

भीती हेच मृत्यूचे कारण! 
कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे असताना अनेक जण भीतीमुळे आजार अंगावर काढतात. शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हाती वेळ कमी असल्याने डॉक्‍टरांचे प्रयत्न कामी येत नाहीत. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास 40 तासांत फुफ्फुसांमध्ये विषाणूंचे प्रमाण वाढते. आजार नसलेल्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास 70 ते 72 तासांत फुफ्फुसे विषाणूच्या प्रादुर्भावाने भरतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास अवघ्या पाच ते सहा दिवसांत रुग्ण दगावल्याची उदाहरणे समोर आली आहेत. 28 जूनपर्यंत व्हेंटिलेटरवर 19, तर ऑक्‍सिजनचा सपोर्ट असलेले 175 रुग्ण आहेत. दोन हजार 40 बाधित रुग्णांच्या तुलनेत ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी शेवटच्या क्षणी रुग्ण दाखल होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याची बाब समोर आली आहे. 

दृष्टिपथात कोरोनाची स्थिती 
- शहरातील रुग्ण - दोन हजार 40 
- ऍक्‍टिव्ह रुग्ण - एक हजार 84 
- मृत्यू - 104 
- व्हेंटिलेटरवरचे रुग्ण - 19 
- ऑक्‍सिजनचा सपोर्ट असलेले रुग्ण - 175 
- खासगी रुग्णालयात शिल्लक खाटा - एक हजार 39 
- सरकारी रुग्णालयांमधील शिल्लक खाटा - एक हजार 359 
- शहरात एकूण खाटा - चार हजार 945 
- शहरात कोरोनासाठी खाटा - तीन हजार 332 
- एकूण आयसीयूमधील खाटा - 136 
हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com