भीषण! मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची धडक.. कारचा चक्काचुर..

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 मे 2020

अपघात एवढा भयंकर होता की, जखमीना बाहेर काढता येत नसल्याने क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढवे लागले. जखमीना गोंदे दुमाला फाट्यावर कार्यरत असलेल्या नरेन्द्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिका चालक निवृत्त गुंड यांनी पाथर्डी फाट्यावरील रूग्णालयात दाखल केले.

नाशिक / वाडीवऱ्हे : जखमीना बाहेर काढता येत नसल्याने क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढवे लागले. जखमीना गोंदे दुमाला फाट्यावर कार्यरत असलेल्या नरेन्द्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिका चालक निवृत्त गुंड यांनी पाथर्डी फाट्यावरील रूग्णालयात दाखल केले. 

असा घडला अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळद (घोलपाचे) फाट्याजवळ आठवा मैलावर राजुरकडे जाण्यासाठी रस्ता ओलाडतांना आयवा ट्रकने पजेरो कारला धडक दिल्याने दोन जण ठार झाले असून तिसरा गंभीर जखमी आहे. हे सर्व जण मुंबईत राहणारे आहेत. आठवा मैलावर रात्री साडे नउच्या सुमारास मुंबईहुन जळगावला मेडिकल किटच्या कामासाठी जात असलेल्या पजेरो कारला (एमएच 04 एचएफ 1917)  आयवा ट्रक (एमएच 15 जीयु 9222) ने राजुरकडे रस्ता ओलांडताना धडक दिली. अपघातात पजेरो कारचा चक्काचुर होऊन 3 जण गंभीर जखमी झाले.

जखमी क्रेनच्या सहाय्याने बाहेर

अपघात एवढा भयंकर होता की, जखमीना बाहेर काढता येत नसल्याने क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढवे लागले. जखमीना गोंदे दुमाला फाट्यावर कार्यरत असलेल्या नरेन्द्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिका चालक निवृत्त गुंड यांनी पाथर्डी फाट्यावरील वक्रतुंड रूग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

जखमीवर उपचार सुरु असताना अभिषेक दत्ता बरदाडे (वय 26) प्रकाश साहु (वय 52) सर्व रा.मुंबई या दोघांचा आज पहाटे मृत्यु झाला. तर पराग महादु वाळके (वय 27) गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आयवा ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक विश्वास देशमुख तपास करीत आहे.

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dangerous accident at mumbai agra highway nashik marathi news