आडगाव शिवारात आढळला मृत बिबट्या; पंचनामा करताच वनविभागाकडून खुलासा

दत्ता जाधव
Tuesday, 15 September 2020

आडगाव शिवार येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना द्राक्षबागेत एक मोठा बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. पण त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करताच वनविभागालाही धक्का बसला.

नाशिक / पंचवटी : आडगाव शिवार येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना द्राक्षबागेत एक मोठा बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. पण त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करताच वनविभागालाही धक्का बसला.

मृत बिबट्या शिवारात आढळताच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

अलीकडे बिबट्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने तो चिंतेचा विषय आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमागील मळेवस्तीत एका शेतकऱ्याला बिबट्या मृतावस्थेत आढळला. वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याची तपासणी केली असता तो नर असून, साधारण पाच वर्षांचा असावा, असा अंदाज व्यक्त केला. तपासणी दरम्यान बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फुफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे ठोस कारण अहवालात नमुद करण्याकरिता व्हिसेरा राखून ठेवल्याची माहिती भदाणे यांनी दिली.  . हा बिबट्या साधारणत: दोन दिवसांपुर्वी झाला असावा असा अंदाज असल्याचे सांगण्यात येत आहे .दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी असल्यामुळे बिबट्याच्या मृत्यूचे ठोस कारण नमुद करणे गरजेचे असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, प्रथमदर्शनी अंतर्गत रक्तस्त्राव, संसर्ग हे कारण नोंदविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.",

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा

मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर वन विभागाच्या रोपवाटिकेत अधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead leopard found In Adgaon Shivar nashik marathi news