आरटीई प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदत; प्रतिक्षा यादीतील बालकांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू 

अरुण मलाणी
Sunday, 18 October 2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाकरीता ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला विलंब झालेला असून, प्रवेशाच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. दरम्‍यान प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत‍ प्रतिक्षा यादीतील बालकांना प्रवेश दिले जात असून, यासाठी येत्‍या शुक्रवार (ता.२३) पर्यंत मुदत असेल. 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाकरीता ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला विलंब झालेला असून, प्रवेशाच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. दरम्‍यान प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्‍ह्‍यातील ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५७ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज ऑनलाइन स्‍वरूपात प्राप्त झालेले आहेत. ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड केल्‍यानंतर आतापर्यंत ३ हजार ६८५ प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्‍या प्रवेश निश्‍चितीसाठी शुक्रवार (ता.२३) पर्यंत मुदत असेल.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागानुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जात आहे. परंतू पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये, असे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे. आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांकाची माहिती मिळवावी. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये अशा स्‍पष्ट सूचनादेखील शिक्षण विभागाने दिल्‍या आहेत. 

प्रवेशाकरिता लागणारी कागद पत्रे

पालकांनी शाळेत प्रवेशासाठी सोबत प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती या टॅबवर क्‍लिककरून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटर यांची प्रत काढून शाळेत घेऊन जायचे आहे.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for RTE admission is Friday nashik marathi news