केंद्राच्या निर्णयाने स्थानिकांच्या अडचणीत वाढ : आमदार हिरामण खोसकर

गोपाल शिंदे
Monday, 22 February 2021

इगतपुरी तहसीलदार कार्यालयात सोमवारी (ता.२२) सर्वपक्षीय टोलमाफीसाठी बैठक झाली. स्थानिकांना टोल माफी झालीच पाहिजे, यासाठी विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता

घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालूक्याने राष्ट्रीय विकासाला गती देण्यासाठी अनेकदा भूसंपादन सहन केले. केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असेल आणि स्थानिकांना टोल माफ करणार नसेल तर न्याय कोणाकडे मागयचा. आजपावेतो केंद्राने दुट्टपी भूमिका घेतल्याने स्थानिक विकासाकडे काणाडोळा करण्यात आला. मात्र मी हे सहन करणार नाही. स्थानिकांना टोल माफी व स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले. 

इगतपुरी तहसीलदार कार्यालयात सोमवारी (ता.२२) सर्वपक्षीय टोलमाफीसाठी बैठक झाली. स्थानिकांना टोल माफी झालीच पाहिजे, यासाठी विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात बैठकीत सर्वानुमते स्थानिकांना टोल फ्री करण्यासाठी आपले दस्तावेज टोल प्रशासनाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी स्थानिकांना टोल माफ करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यावर आजची ही महत्वपूर्ण बैठक झाली.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

 तहसीलदारांकडून दिलजमाई 

सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पाहता व टोल प्रशासन यांच्यात दिलजमाई करण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी चाणाक्षपणे पार पाडले. यामुळे वादात होणारी बैठक काही वेळातच शांततेत पार पडली. यामुळे सर्वांना समान न्याय मिळाल्याची भावना लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर दिसून आली. 

तहसीलदार परमेश्वर कासुळे, माजी आमदार शिवराम झोले, सभापती सोमनाथ जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरख बोडके, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, माजी सभापती भगवान आडोळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, मनसेचे संदीप किर्वे, मूलचंद भगत, टोल व्यवस्थापक फरहान खान, सुनील वाजे, भास्कर गुंजाळ, भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, योगेश चांदवडकर, शिवसेनेचे व्यकंट भागडे, नंदलाल भागडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ, रवी गव्हाणे, खंडू परदेशी आदी उपस्थित होते. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision of the central government has increased the hardships of the locals says Mla Khoskar nashik news