कोरोना वाढतोय,सोशल डिस्टन्सिंगही घटले! जनजीवन असुरक्षित  

विनोद बेदरकर
Saturday, 20 February 2021

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी सुरक्षित अंतर मात्र घटत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यावरील कामकाजात लोकांचा निष्काळजीपणा वाढला असून, त्यात कोरोना टाळण्यासाठी आवश्यक असलेले लोकांमधील सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) कमी झाले आहे. 

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी सुरक्षित अंतर मात्र घटत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यावरील कामकाजात लोकांचा निष्काळजीपणा वाढला असून, त्यात कोरोना टाळण्यासाठी आवश्यक असलेले लोकांमधील सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) कमी झाले आहे. 

सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) कमी
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्ह्याही याला अपवाद नाही. दोन आठवड्यांपासून नाशिकला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शहर- ग्रामीण अशा दोन्ही भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यभर प्रतिबंधात्मक उपायोजनांना वेग आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध सुरू झाले आहेत. लॉन्स, मंगल कार्यालयांसह सार्वजनिक 
कार्यक्रमासाठी गर्दी कमी करण्यासाठी अवघ्या ५० वर नियंत्रित केले आहे. सगळीकडे या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, हेच चित्र सध्या दिसत आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

गर्दीच गर्दीच 
लग्नाचे तीन मुहूर्त शिल्लक आहेत. लोकांनी तीनशेपासून तर हजार लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करून लॉन्स, मंगल कार्यालयांचे बुकिंग केले आहे. लग्नपत्रिका वाटून झाल्या. आता ऐनवेळी लोकांची गर्दी कमी करायची कशी, ही घरी विवाह असलेली कुटुंब आणि लॉन्स, मंगल कार्यालयांची विवंचना आहे.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decreases social distancing nashik marathi news