पाकिस्तानला माहिती पुरविणारा दीपक शिरसाठ अखेर कारागृहात; लंडनहून हनीट्रॅप!

अरुण मलाणी
Tuesday, 20 October 2020

शिरसाठकडून जप्त केलेल्या तीन मोबाईल, पाच सीमकार्ड, दोन मेमरीकार्ड फॉरन्सिक लॅबला देण्यात आली असून, त्याचा अहवाल प्रत्यक्षात आलेला नाही. दरम्यान, या प्रकरणात शिरसाठ एकटाच हनीट्रॅपमध्ये फसल्याचे समोर आले आहे.

नाशिक : सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला जाळ्यात अडकवत त्‍याच्‍याकडून एचएएलमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्‍या व्‍यक्‍तीस पाठविल्‍याचा प्रकार समोर आला होता. यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शिरसाठला अटक केली होती. या वेळी त्‍याच्‍याकडून तीन मोबाईल, पाच सीमकार्ड व दोन मेमरीकार्ड जप्त करत फॉरन्सिक लॅबमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविले होते.

रवानगी मध्यवर्ती कारागृहात

ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) कंपनीत हेरगिरी करत गोपनीय माहिती पाठविल्‍याच्या आरोपानंतर अटक केलेल्‍या संशयित दीपक शिरसाठ याला सोमवारी (ता. १९) न्‍यायालयात हजर केले. त्या वेळी सुनावणीनंतर न्‍यायालयाने संशयित शिरसाठ यास न्‍यायालयीन कोठडी सुनावली. त्‍याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. 

पाकिस्तानमधील आरोपींचा लंडनमधून हनीट्रॅप 

शिरसाठ यास हनीट्रॅपमध्ये फसवून त्याच्याकडून एचएएल कंपनीतील संवेदनशिल माहिती पाकिस्तानमधील आरोपींनी लंडनमध्ये राहून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे शिरसाठ यास दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. शिरसाठ याने २०१९ मध्ये संबंधित महिलेला सोशल मीडियावरून संवेदनशील माहिती पुरवल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरसाठकडून जप्त केलेल्या तीन मोबाईल, पाच सीमकार्ड, दोन मेमरीकार्ड फॉरन्सिक लॅबला देण्यात आली असून, त्याचा अहवाल प्रत्यक्षात आलेला नाही. दरम्यान, या प्रकरणात शिरसाठ एकटाच हनीट्रॅपमध्ये फसल्याचे समोर आले आहे.  

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

संशयिताला न्‍यायालयीन कोठडी
दीपकला न्‍यायालयासमोर हजर केले असता, दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सखोल तपास करत असताना, अनेक बाबी उघडकीस आल्‍याचे सांगितले जात आहे. गेल्‍या वर्षी २०१९ मध्ये संशयित शिरसाठने महिलेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना संवेदनशील माहिती पुरवल्याचे सूत्रांनी सांगितले. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्‍यानंतर सोमवारी (ता. १९) न्‍यायालयासमोर हजर केले असता, पोलिसांनी आणखी पाच दिवसांच्‍या कोठडीची मागणी केली. युक्तिवादानंतर न्‍यायालयाने संशयिताला न्‍यायालयीन कोठडी सुनावली. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepak shirsath went to jail for HAL spying nashik marathi news