संगणकात वजाबाकी नाहीच; त्र्यंबकेश्‍वरला कराच्या तफावतीचे भिजते घोंगडे कायम

कमलाकर अकोलकर
Thursday, 1 October 2020

यापूर्वीच्या कर आकरणी कर्मचाऱ्यांची बदली झाली असली तरी सखोल चौकशी करण्याची मागणी आहे. सदोष कर आकारणीला जबाबदार असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी यातून आर्थिक अडवणूक चालविली आहे. त्याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वरला पालिकेने नागरिकांच्या मालमत्तावर चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केलेली असून, येथील मालमत्ताधारकांनी सदोष कर आकारणीविषयी पालिकेच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याच्या बदलीशिवाय काहीही होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

करांचे तफाविताचे भिजत घोंगडे कायम
 
चुकीच्या कर आकारणीबाबत नागरिकांनी त्र्यंबकेश्‍वर पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्याबाबत दखल घेतली जात नाही, अशी ओरड आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील व्यवसाय कोरोनामुळे सहा महिन्यांपासून ठप्प असूनही मालमत्ताधारकांना रकमा भरण्याविषयी नोटिसाही देण्यात आल्या आहेत. १९१२-१३ मध्ये मालमत्ताधारकांकडे पाहून या रकमा आकारल्या असून, त्या आकारताना येथील कर्मचाऱ्यांनी मनमानी केल्याचे संबंधित खात्याच्या लक्षात आल्यावर त्या कर्मचारी व त्याच्या मदतनीसास अभय देऊन फक्त बदली केली. परंतु कारवाई न केल्याने मालमत्ता करांचे तफाविताचे भिजत घोंगडे कायम आहे. लॉकडाउन काळात सगळे शहर ठप्प असून, व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. 

...असा करधारकांचा प्रश्‍न 

सध्या अनेकांना व्यवसाय राहिलेले नाही. त्यामुळे उत्पन्नच नसल्याने नागरिक मोठ्या रकमा कोठून भरणार, असा करधारकांचा प्रश्‍न आहे. मालमत्ता कर भरूनही अनेक नागरिकांना दुप्पट ते चौपट बिल आकारणी येत असून, ते कोणत्या प्रकारे आकारले याचा खुलासा होत नाही. येथील कॉम्प्युटरमध्ये वजाबाकी होत नसल्याने वाढीव आकारणी होत असल्याचे थातूर-मातूर उत्तरे नागरिकांना देऊन बोळवण केली जाते. यापूर्वीच्या कर आकरणी कर्मचाऱ्यांची बदली झाली असली तरी सखोल चौकशी करण्याची मागणी आहे. सदोष कर आकारणीला जबाबदार असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी यातून आर्थिक अडवणूक चालविली आहे. त्याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

वजाबाकीच होत नाही 

चुकीची कर आकारणी होण्यामागे कर्मचाऱ्यांकडून संगणकात वजाबाकी होत नसल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे असा कुठला संगणक आहे ज्यात वजाबाकी होत नाही, याची चौकशीची 
मागणी आहे. 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

कोरोनाच्या काळात सगळे व्यवसाय ठप्प असताना अवास्तव कर आकारणी होणार नाही. मालमत्ताधारकांना बळजबरी केली जाणार नाही. कर आकारणीत ज्या तफावती आहे त्याविषयी रेडीरेकनरद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणीचा विषय सोडविला जाईल. - पुरुषोत्तम लोहगावकर (नगराध्यक्ष, त्र्यंबकेश्‍वर पालिका)  

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defective taxation of Trimbakeshwar nashik marathi news