कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी "ट्‌विटर मिशन'...नरेंद्र मोदी, अमित शहांना करणार "टॅग'  

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

राज्यभरातील कांदा उत्पादकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असून, शेतकरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निर्यातबंदी उठवण्याची विनंती करतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे म्हणाले, की राज्यातील शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ट्‌विटरच्या माध्यमातून सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा आहे.

नाशिक : कांद्याचे भाव घसरल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. तरीही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आता "ट्‌विटर मिशन' मोडवर सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. ट्‌विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून निर्यातबंदी उठवण्याची मागणी रेटण्यात येणार आहे. 

पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांना निर्यातबंदी उठवण्याची विनंती

राज्यभरातील कांदा उत्पादकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असून, शेतकरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निर्यातबंदी उठवण्याची विनंती करतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे म्हणाले, की राज्यातील शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ट्‌विटरच्या माध्यमातून सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्याचा वापर ते प्रभावीपणे करत आहेत. आतापर्यंत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, या मागणीसाठी संघटनेने अनेक आंदोलने केली. त्याचा पुढील टप्पा म्हणून ट्‌विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत पोचावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे. 

हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

शेतकऱ्यांनी ट्‌विटर अकाउंट सुरू करायचे आहे

"महाराष्ट्राचा कांदा उत्पादक ऑन ट्‌विटर हे मिशन राबविण्यात येईल. त्यामध्ये कांदा उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित आहे. ट्‌विटर नेमके कसे वापरायचे, याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी ट्‌विटर अकाउंट सुरू करायचे आहे. -भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for lifting onion export ban "Twitter Mission Nashik Marathi News