ऑफिसमध्ये तिला उशिरापर्यंत थांबवले..अन् केबिनमध्ये बोलविले...त्यानंतर..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

ती कार्यालयात नोकरी करते. बुधवारी (ता. 22) संशयिताने तिला ऑफिसची वेळ संपल्यानंतर कामाच्या बहाण्याने थांबवून ठेवले. ऑफिसमध्ये कोणी नसताना त्याने पीडितेला केबिनमध्ये बोलविले आणि केबिनचा दरवाजा लावून घेतला. अन् मग... 

नाशिक : उपनगर परिसरातील कार्यालयात उशिरापर्यंत थांबवून पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला प्रकार....

सोनू झुंज (वय 35, रा. सह्याद्री सोसायटी, देवळाली कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती संशयित झुंज याच्या कार्यालयात नोकरी करते. बुधवारी (ता. 22) संशयिताने पीडितेला ऑफिसची वेळ संपल्यानंतर कामाच्या बहाण्याने थांबवून ठेवले. ऑफिसमध्ये कोणी नसताना त्याने पीडितेला केबिनमध्ये बोलविले आणि केबिनचा दरवाजा लावून घेत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिला असता, संशयिताने पोलिसांत तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा >  माझा काय दोष..मी का "नकोशी"? लुकलुकत्या डोळ्याने 'तिने' जणू विचारले...

दुसरीकडे कुरापत काढून महिलेचा विनयभंग 
नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरातील स्वामी समर्थनगरमध्ये दोघांविरोधात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. किरण भालेराव, कुणाल जाधव (रा. स्वामी समर्थनगर) अशी संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. 23) त्या घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी आल्या असता संशयित दोघांनी गॅलरीत पाणी व कचरा टाकत असल्याची कुरापत काढून भांडण केले. त्या वेळी संशयित किरण भालेराव याने महिलेला स्पर्श करीत अश्‍लील चाळे करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तर संशयित जाधव याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

VIDEO : "गणित शिकवायला हीच शिक्षिका हवी." ट्रिक बघून व्हाल हैराण! व्हिडिओ तुफान व्हायरल..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for physical relation by staying up late at office Nashik Marathi News