वाद गेला विकोपाला..संतापात शेतकऱ्याचा खून.. सीसीटीव्हीमुळे 'अशी' झाली गुन्ह्याची उकल 

2.jpeg
2.jpeg

नाशिक : घराचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी धोंडेगावातील शेतकरी मोतीराम बेंडकोळी यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी बेंडकोळी यांनी माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. यातून शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर संतापलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला.मात्र सीसीटिव्हीतून अशी झाली गुन्ह्याची उकल...

असा घडला प्रकार
संशयित गणेश मानकर व्याजाने पैसे देतो. संशयित रामनाथ शिंदे व विकास धात्रक यांना पैशांची गरज होती, म्हणून ते मानकर याच्याकडे गेले. तर मानकर यास धोंडेगावातील बाळासाहेब म्हैसधुणे यांच्याकडून 90 हजार रुपये घेणे होते. त्यामुळे चौघेही गेल्या 11 तारखेला रात्री आठ-साडेआठ वाजता धोंडेगावात कारने गेले. म्हैसधुणे यांच्या घराचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी धोंडेगावातील शेतकरी मोतीराम बेंडकोळी यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी बेंडकोळी यांनी माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. यातून शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर संतापलेल्या चौघांनी बेंडकोळी यांच्यावर संशयितांनी चाकूने उर्मी वार केले. यात गंभीर जखमी बेंडकोळी रस्त्यावर कोसळताच चौघांनी कारने पलायन केले. तसेच गुन्ह्यातील स्विफ्ट डिजायर (एमएच 15 डीएस 9178) कार हिरामण धात्रक याच्या मालकीची असून तिच्यावर फायनान्सचे कर्ज होते. हफ्ते थकल्याने फायनान्सवाले कार ओढून नेतील म्हणून त्याने दुसऱ्याच्या कारची (एमएच 15 डीएम 5009) नंबरप्लेट त्याच्या कारला लावलेली होती. 

सीसीटिव्हीतून गुन्ह्याची उकल

 गेल्या (ता.11) मे रोजी धोंडेगाव येथे शेतकरी मोतीराम वामन बेंडकोळी (55) यांचा संशयितांनी मांडीवर, पोटावर चाकूने वार करून खून केला होता. पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास केला. या पथकाने धोंडेगाव शिवारातील संजीवनी हार्ट केअर ऍण्ड रिसर्च सेंटरच्या प्रवेशद्वारावरील सीसीटिव्ह कॅमेरा तपासले असता, यात पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आढळून आली. या कारचा शोध घेतला असता, सदरची कार उमराळे शिवारात उभी असल्याची खबर पथकाला मिळाली. पोलिसांनी कारमालक संशयित हिरामण कारभारी धात्रक यास ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याचे तीनही संशयित साथीदारांना मखमलाबाद परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर संशयितांनी खुनाची कबुली दिली. याप्रकरणी हरसुल पोसिलात गुन्हा दाखल आहे. 

धोंडेगाव खूनप्रकरण : चौघांना अटक 

धोंडेगाव शिवारातील शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी सीसीटीव्हीमध्ये संशयितांची कार आणि या कारवरून एकाला उमराळ्यातून तर तिघांना मखमलाबाद शिवारातून अटक केली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली असून, पत्ता विचारण्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीतून संशयितांनी 55 वर्षीय शेतकऱ्यावर चाकू हल्ला करीत खून केला होता. याप्रकरणी हरसुल पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल आहे. 
हिरामाण काशिनाथ धात्रक (43, रा. धोतरओहोळ, उमराळे, ता दिंडोरी), गणेश दत्तात्रय मानकर (43, रा. मखमलाबाद, नाशिक), रामनाथ बबन शिंदे (33, रा. आडगाव, हल्ली रा. उमराळे बुद्रुक), विकास उर्फ कृष्णा शिवाजी धात्रक (30, रा. उमराळे ता. दिंडोरी) अशी संशयितांची नावे आहेत

पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी 

पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक के.के. पाटील, सहायक निरीक्षक स्वप्निल राजपुत, उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, हवालदार हनुमंत महाले, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, भगवान निकम, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आव्हाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com