दुपारी जेवल्यानंतर झोप येतेय? पण परिणाम पाहून व्हाल थक्क!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणे म्हणजे स्वर्गसुखच...दुपारच्या झोपेपासून अनेकजण स्वत:ला रोखू शकत नाही..दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. पण या झोपेचे काय परिणाम आहेत..हे जर का तुम्हाला समजले..तर तुमची झोपच उडेल.

नाशिक : दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणे म्हणजे स्वर्गसुखच! दुपारच्या झोपेपासून अनेकजण स्वत:ला रोखू शकत नाही..दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. पण या झोपेचे काय परिणाम आहेत..हे जर का तुम्हाला समजले. तर तुमची झोपच उडेलकारण दुपारची जेवणानंतरची झोप शरीरासाठी वाईट असते. शरिराला अनेक तोटे असतात त्यातलेच काही आपण बघूया...
 
हे आहेत दुपारी झोपण्याचे तोटे...
अनेक व्यक्तींना दुपारी झोपण्याची सवय लागते, झोप ही निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र दुपारी जेवण झाल्यावर झोपणे अपायकारक ठरते. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाला अडचणी येतात. याबरोबर शरीरात मेदाचा देखील संचय वाढत जातो.  यासाठी दुपारची झोप टाळलेलीच बरी.

शरीरातील फॅटस वाढतात
 दुपारी झोपल्यामुळे शरिरात मेदाचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण वाढत असते. दुपारी झोपेच्या अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, आणि वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

कफदोष वाढतो
दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

मधुमेहाचा धोका वाढतो
दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात मधूमेह होण्याची शक्यता वाढतात.

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

त्वचा रोगाचा धोका 

अनेक वेळेस रक्त दूषित होण्याचे कारण हे दुपारची झोप हेही असू शकते. कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. त्यासोबतच यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disadvantages of sleeping in the afternoon Nashik Marathi News