माहिती, शिक्षण, संवादातून आपत्तीचा सामना करणे शक्य; जिल्हाधिकारींचे प्रतिपादन

suraj mandhre 123.jpg
suraj mandhre 123.jpg

नाशिक : आपत्तीच्या प्रसंगात स्वतःसोबत इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत योग्य माहिती नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपत्तीप्रसंगी बचावकार्य कसे करावे, याबाबतची योग्य माहिती व शिक्षण असल्यास ते संवादाच्या विविध माध्यमांतून सर्वांपर्यंत सहज पोचवता येते. त्यातूनच आलेल्या आपत्तीचा सामना करणे सहज शक्य होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

माहिती, शिक्षण, संवादातून आपत्तीचा सामना करणे शक्य 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जागतिक आपत्ती व्यवस्थापन निवारण दिनाच्या निमित्ताने भोसला मिलिटरी स्कूलतर्फे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, गौण खनिज अधिकारी आनंद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, तहसीलदार रचना पवार आदी उपस्थित होते. एखादी इमारत कोसळली, तर अशा आपत्तीच्या परिस्थितीत कशा पद्धतीने बचावकार्य केले जाते, याचे प्रात्याक्षिक या वेळी दाखविण्यात आले.

यात सक्षम व्यक्तीला, जखमी परंतु शुद्धीवर असलेल्या व्यक्तीला खाली उतरविणे, जखमी व्यक्तीला पाठीवर घेऊन खाली उतरणे, बेशुद्ध व्यक्तीला स्ट्रेचरवर खाली सोडणे, बेशुद्ध व्यक्तीला वरती घेणे अशा विविध प्रात्यक्षिकांचा समावेश होता. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशनचे संतोष जगताप, संतोष वाबळे, सुजित पंडित, योगेश सहारे, विक्रम बेंडकुळे, वंदना कुलकर्णी, चेतना शर्मा, साक्षी गोयल यांनी प्रात्यक्षिके सादर केली.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com