द्राक्षांच्या नुकसानीबाबत करणार विमा कंपन्यांशी चर्चा - भुजबळ

विनोद बेदरकर
Monday, 11 January 2021

शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका दिला आहे. त्यात, सर्वाधिक नुकसान द्राक्ष व कांद्याचे झाले आहे. दरम्यान, या विमा कंपन्यांकडून १५ ऑक्टोबरपूर्वी छाटणी झालेल्या बागांच्या भरपाईला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याबाबत जिल्हाधिकारी विमा कंपन्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

नाशिक : शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका दिला आहे. त्यात, सर्वाधिक नुकसान द्राक्ष व कांद्याचे झाले आहे. दरम्यान, या विमा कंपन्यांकडून १५ ऑक्टोबरपूर्वी छाटणी झालेल्या बागांच्या भरपाईला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याबाबत जिल्हाधिकारी विमा कंपन्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

भुजबळ - सप्टेंबरमधील छाटणीच्या बागांचा प्रश्न 
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत ते म्हणाले, की आतापर्यंत तीन हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दोन लाख ७० हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. दरम्यान, यात सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपूर्वी छाटणी झालेल्या द्राक्षबागांना विमा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या अडचणीबाबत विचारले असता श्री. भुजबळ म्हणाले, की गेल्या वेळीही ही अडचण आली होती. त्याविषयी जिल्हाधिकारी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून हा विषय मार्गी लावणार आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्षाचे

जिल्ह्यातील नाशिक शहरासह सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, दिंडोरी, नाशिक, सटाणा आदी भागांतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, आंबा, कांदा, भाजीपाला, ऊस व द्राक्षांना सर्वाधिक दणका बसला. त्यात निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्षाचे झाले आहे.  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discuss grape loss with insurance companies said chhagan bhujbal nashik marathi news