पेठ तालुक्यात भातपिकावर रोग; हातातोंडाशी आलेले पीक अडचणीत 

रखमाजी सुपारे
Monday, 12 October 2020

कोरोनाच्या अस्मानी संकटाबरोबर भातशेतीवर नैर्सगिक संकटाने आक्रमन केल्याने शेतकरी मेटाकुटीला येत वर्षभर कुंटूब जगवायचं कस हा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे .

नाशिक/पेठ : आदिवासी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अंतिम चरणात रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने गरे भातपीक शेतातच वाळत आहे. त्यामुळे वर्षाभरासाठी आधार असलेले भातपीक हातचे जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण आहे. 

पेठ तालुक्यातील माळेगाव, निशाणखडक, वीरमाळ, करंजखेड, आंबे, पाहुचीबारी, जोगमोडी, कोपुर्ली खू, सुरगाने उंबरपाडा या परिसरातील गरवे भातशेतीवर मोठया खोडकिड, करपा, तांबेरा, बुरशी युक्त ताक्या रोगाचा प्रार्दूभाव झाला आहे . त्यामुळे भात जमिनीवर आडवा पडून पिकाची मोठी हानी झाली आहे. दाणे भरण्याच्या टप्प्यात पीके जमिनीवर आडवे पडून वाळत चालले आहेत. परिणामी भात पीक हातचे जात असून कोरोनाच्या अस्मानी संकटाबरोबर भातशेतीवर नैर्सगिक संकटाने आक्रमन केल्याने शेतकरी मेटाकुटीला येत वर्षभर कुंटूब जगवायचं कस हा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे . पेठ तहसिलदार यांनी तालुक्याचा दौरा करून भातशेतीची पाहणी करावी अशी मागणी माळेगांव सह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे . 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

भातशेती बाधीत (नुकसान ) झाली आहे, व ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा घेतला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक नुकसान सुचना फॉर्म तात्काळ भरून तालुका कृषी कार्यालयात अथवा संबंधित विमा प्रतिनिधीकडे देणे बाबत सुचना दिल्या आहेत. 
- अरविंद पगारे ( कृषी अधिकारी पेठ तालुका) 
 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diseases on rice crops peth nashik marathi news