esakal | राज्यात 43 लाख क्विंटल अन्न-धान्याचे वाटप - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

ration chhagan bhujbal.jpg

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी, असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 51 हजार 43 क्विंटल गहू, 14 लाख 28 हजार 545 क्विंटल तांदूळ, तर 17 हजार 121 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

राज्यात 43 लाख क्विंटल अन्न-धान्याचे वाटप - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये राज्यातील एक कोटी 35 लाख 54 हजार 441 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी, असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 51 हजार 43 क्विंटल गहू, 14 लाख 28 हजार 545 क्विंटल तांदूळ, तर 17 हजार 121 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले, परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे सहा लाख 68 हजार 622 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. 

हेही वाचा > मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह.. २४ तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर...

छगन भुजबळ  जूनपर्यंत लाभार्थ्यांना उपलब्ध होणार शिधा 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. गेल्या 3 एप्रिलपासून पात्र रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित केले जात असून, दहा लाख 80 हजार 210 क्विंटल तांदळाचे वाटप केले आहे. या योजनेसाठी 35 लाख 820 क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिलसोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

go to top