जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरीस ११०.६४ टक्के पाऊस! तीन तालुक्यात मात्र सरासरी पेक्षा कमीच

rainfall in nashik district
rainfall in nashik district

नाशिक : ऑक्टोबर महिन्यात पावसाने दमदार कामगीरी केली आहे. संपुर्ण महिनाभर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहीला. हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज सप्टेंबर एवजी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस खरा ठरला आहे. दरम्यान जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या कमी पाऊस झालेल्या तालुक्यात मात्र पाऊस सरासरी गाठेल ही आपेक्षा पुर्ण झाली नाही .

ऑक्टोबरमध्ये अनेक भागात दमदार पाऊस होऊनही हे तीन तालुके यंदा सरासरी गाठू शकले नाहीत. त्यामुळे आगामी काळात या तालुक्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. जिल्ह्यातील जास्त पावासासाठी ओळखले जाणारे जिल्हे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि नाशिक या तालुक्यांमध्ये मात्र यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा जोर काहीसा कमी राहिला. सप्टेंबरअखेरपर्यंत इगतपुरी आणि नाशिक या दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी गाठली असली, तरी पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर हे तालुके मात्र ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंतदेखील सरासरी गाठू शकलेले नाहीत.

यंदा जिल्ह्यात ११० टक्क्यांच्या आसपास पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. सप्टेंबरअखेरीस नाही, तरी ऑक्टोबर अखेरीस ११०.६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १८८ टक्के पाऊस बागलाण तालुक्यात नोंदविला गेला आहे. देवळा आणि सिन्नरमध्ये १६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. १२ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असला, तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजेच ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सुरगाण्यात ७८.९८, तर पेठमध्ये ७८. ९७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ऑक्टोबरमध्ये १०२ टक्के

जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ऑक्टोबर महिन्यात १३३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी ८९.२५ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात बागलाण तालुक्यात सरासरीच्या २८१ टक्के पाऊस झाला आहे. येवल्यात २५७ टक्के, देवळ्यात २१५ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली नसली तरी केवळ ऑक्टोबर महिन्यात १०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या १४४ टक्के पाऊस झाला आहे.


तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

तालुका पाऊस (टक्के)

नाशिक १०८.१३

इगतपुरी १२३.३३

दिंडोरी १०३.०३

पेठ ७८.९७

त्र्यंबकेश्वर ६४.०४

मालेगाव १७५.७८

नांदगाव १५७.३३

चांदवड १३४.६६

कळवण १०५.४९

बागलाण १८८.३२

सुरगाणा ७८.९८

देवळा १६०.९१

निफाड १३३.१०

सिन्नर १५६.३३

येवला १६०.४१

एकूण ११०.६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com