Diwali Festival 2020 : दिवाळीच्या फराळाचा खमंग पोस्टाच्या पार्सल सेवेद्वारे परदेशात.

diwali faral.jpg
diwali faral.jpg

दहीवड (जि.नाशिक) : दिवाळी म्हटली की घराघरात दिवाळीच्या फराळाचा खमंग असतो. या निमित्ताने फराळाची देवाण घेवाण केली जाते. परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी सध्या पोस्टाच्या पार्सल सेवेचा लाभ घेतला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे परदेशातच अडकून असलेल्या नातेवाईकांना बरेचजण पोस्टाच्या पार्सल सेवेद्वारे फराळ पाठवित आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 
नाशिक पोस्ट कार्यालयातून परदेशात फराळ पाठवण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे शंभराहून अधिक फॉरेन फराळाचे पार्सल विविध देशांत रवाना झाले आहेत. घरी तयार केलेले फराळ परदेशात पाठवून अनेकजण नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी केल्याचा अप्रत्यक्ष आनंद अनुभवताना दिसताय. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होता आले नसले तरी परदेशात फराळ पाठवून भारतीयांनी दिवाळीची आपुलकी जपली आहे. कामानिमित्त परदेशात स्थिरावलेले नागरिक कितीही दूर असले तरी आपला कुटुंबकबिला घेऊन भारतात दिवाळी एकत्र येत साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे.

मात्र परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तसेच नोकरी निमित्ताने स्थायिक झालेल्या किंवा कायम वास्तव्यात असणाऱ्या स्नेहीजनांसाठी दिवाळीला घरी येणे बऱ्याचदा शक्य नसते. अशा परदेशी भारतीयांना दिवाळीच्या उत्सवात सामावून घेण्यासाठी पोस्टाची खास दिवाळी फराळाचे परदेशी पार्सल सेवा सुरू आहे. या सेवेमुळे परदेशी भारतीयांना दिवाळीच्या फराळाचा खमंग व चव अनुभवायला मिळणार आहे. नाशिकच्या पोस्ट विभागा मार्फत दिवाळीच्या आठ दिवस अगोदर फराळाची पार्सल सेवा सुरू करण्यात आली. अवघ्या काही दिवसात परदेशी भारतीयांपर्यंत फराळ पोहोचते. यामुळे परदेशातील प्रत्येक भारतीयाला घरी केलेल्या फराळाचा खमंग आणि चव प्रत्यक्ष चाखायला मिळते. नाशिकमधून अनेकांनी विविध देशांतील आपल्या नातेसंबंधातील भारतीयांना फराळ पाठविले आहे. नाशिक विभागातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, नेदरलँड आदी देशात पोस्टातून फराळाचे पार्सल पाठवले आहेत. 


भारतीय डाक विभाग नेहमी प्रमाणेच आपल्या ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या सेवा देण्यासाठी तत्पर असून, यावर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जवळजवळ शंभरपेक्षा जास्त दिवाळी फराळाचे पार्सल दुसऱ्या देशात स्थित असलेल्या नाशिककरांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी डाक विभागाच्या सुरू असलेल्या पार्सल सेवेत मार्फत पाठविले आहे. हे पार्सल ज्या दिवशी बुक होतात त्याच दिवशी ते पुढे पाठवले जातात, जेणेकरून वेळेत पोहोच होतील. सध्या पोस्टाच्या पार्सल सेवेसाठी नाशिककरांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे..-बाळासाहेब कराड, असिस्टंट पोस्टमास्तर (नाशिक एच.ओ)



मुलगा अमेरीकेत शिक्षण घेत आहे. दिवाळीला त्याला इकडे येणे शक्य नसते त्यामुळे यंदा त्याला पोस्टाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून दिवाळीचे फराळ पाठविले. पोस्टाची पार्सल सेवा वाजवी दरात उपलब्ध असल्यामुळे फराळाचे साहित्य पाठविणे सोयीचे झाले.- अरुण पवार, सातपूर कॉलनी नाशिक..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com