
केरळातील एका गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही टोळक्यांनी या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्याने त्याचा स्फोट होऊन हत्तीणीचे तोंड रक्तबंबाळ झाले. त्यानंतर तिने नदीच्या पाण्यात उभं राहून आपला जीव सोडला, या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली.
केरळातील एका गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही टोळक्यांनी या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्याने त्याचा स्फोट होऊन हत्तीणीचे तोंड रक्तबंबाळ झाले. त्यानंतर तिने नदीच्या पाण्यात उभं राहून आपला जीव सोडला, या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली. हत्ती हा सर्वात शक्तिशाली प्राणी मानला जातो.अशाच या महाकाय हत्तींशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये कळली तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल ..
-हत्ती खूप शक्तिशाली असतात. त्यांच्यात वाघाला तसेच सिंहाला मारण्याचे धाडस आहे. पण त्यांना मधमाश्यांची भीती वाटते.
-हत्ती अनेकदा कान हलवतो कारण तो कानांच्या पेशींद्वारे शरीराची उष्णता काढून टाकतो. आफ्रिकन हत्तींचे कान फार मोठे आहेत कारण तेथे खूप उष्णता आहे. प्राण्यांमध्ये हत्ती सर्वात उबदार असतात.
-प्राण्यांमध्ये हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो माणसाचा आवाज ऐकून माणूस किंवा स्त्री हे सांगू शकतो.
-हत्तींमध्ये सर्वाधिक ऐक्य आहे. ते कधीही आपापसात भांडत नाहीत आणि जर त्यांच्या गटातील एखाद्याचा मृत्यू झाला तर ते त्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करतात. त्याचे सांत्वन करतात.
-जगातील सर्वात मोठा हत्ती आफ्रिकेत आढळतो, ज्याचे वजन सुमारे 10886 किलो आहे आणि त्याची लांबी 13 फूट आहे. .
-इतक्या मोठ्या हत्तीला खाण्यासाठी 300 किलो अन्न आणि 160 किलो पाणी आवश्यक असते. हत्तीला भूक सहन होत नाही. भूकेसाठी तो वेडापिसा होऊन संपूर्ण जंगलात फिरतो.
-हत्तीचे दोन्ही दात खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यावर एक म्हणसुद्धा प्रसिध्द आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की त्याच्या दोन्ही दातांचे वजन सुमारे 200 किलो असू शकते.
-प्राण्यांमध्ये कुत्र्याची वास घेण्याची क्षमता जास्त असली तरी, हत्ती हा असा प्राणी आहे. जो सुमारे 5 किलोमीटरच्या अंतरावरुन गंधाने पाणी शोधू शकतो.
-हत्ती त्याच्या सोंडेत 8 ते 9 लीटर पाणी भरू शकतो. हत्तीची सोंड खूप शक्तिशाली आहे जी 350 किलोग्रॅम पर्यंत उंचावू शकते.
-हत्तीचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा जास्त असतो, त्याच्या मेंदूचे वजन 5 किलोग्राम पर्यंत असू शकते. दिवसातून फक्त 2 ते 3 तास झोपतात.
हेही वाचा > रेल्वेच्या 'त्या' आयसोलेशन ट्रेन्स आता गेल्यात कुठे ? धक्कादायक माहिती समोर
.या घटनेनंतर सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला आहे. एका मुक्या प्राण्यासोबत केलेल्या या कृत्याने माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आपण इतकं निर्दयी बनलो का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. या घटनेची दखल केंद्र सरकारनेही घेतली, संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी ग्वाही सरकारने दिली.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता