esakal | "देवमाणूस"च निघाला राक्षस! जीव वाचविणाऱ्या डॉक्टरकडूनच विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य; काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

doctor image.jpg

कोरोनाच्या महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाची लढाई लढत कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व नर्सचा एकीकडे सत्कार करून त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्वत:च्या स्वार्थासाठी हाच देवमाणूस जेव्हा राक्षसाचे रुप घेतो तेव्हा...मालेगावात अशी घटना घडली ज्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय.

"देवमाणूस"च निघाला राक्षस! जीव वाचविणाऱ्या डॉक्टरकडूनच विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य; काय घडले?

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : कोरोनाच्या महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाची लढाई लढत कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व नर्सचा एकीकडे सत्कार करून त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्वत:च्या स्वार्थासाठी हाच देवमाणूस जेव्हा राक्षसाचे रुप घेतो तेव्हा...मालेगावात अशी घटना घडली ज्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय.

स्वत:च्या स्वार्थासाठी केले असे

मालेगाव शहरातील संगमेश्‍वर ज्योतीनगर भागातील माहेरवाशीण हेमांगी सोनवणे (वय ३६) या विवाहितेचा हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ करणारा पती डॉ. अतुल सोनवणे (रा. कामटवाडे, नाशिक), सासरे किशोर सोनवणे यांच्यासह सात जणांविरुद्ध येथील छावणी पोलिसांत विवाहिता छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेली पाच वर्षे संशयित राजश्री पार्क, कामटवाडे येथील निवासस्थानी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ करीत होते. पती व सासूने अंगावरील दागिने काढून घेत मुलगा हर्षवर्धनसह आपणाला घरातून हाकलून दिल्याचे श्रीमती सोनवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. छावणी पोलिस ठाण्यात डॉ. अतुलसह सात जणांविरुद्ध विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

नवीन घर विकत घेण्यासाठी विवाहितेचा छळ 
नवीन घर विकत घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून सबाकौसर मुश्‍ताक अहमद (वय २२) या विवाहितेचा छळ करणारा पती मुश्‍ताक अहमद, सासरा नुरुलहुदा अहमद व सासू फैमिदा अहमद (सर्व रा. रसूलपुरा) या तिघांविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दोन वर्षांपासून घरासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून मारहाण, दमबाजी करीत असल्याचे सबाकौसर हिने तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश