डॉक्टर तरुणीचा विनयभंग; तरुणीच्या भावी पतीला दमबाजी 

प्रमोद सावंत
Friday, 13 November 2020

तिच्या होणाऱ्या पतीला पीडित तरुणीशी मी प्रेम करतो, तू लग्न करू नको; अन्यथा ठार मारेन, असा दम दिला होता. तसेच पीडित मुलीच्या वडिलांना व्हॉट्सॲपवर वेळोवेळी मेसेज पाठवूनही त्रास दिला होता. 

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील तीन कंदील भागातील डॉक्टर तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या व डॉक्टर तरुणीच्या भावी पतीला दमबाजी करणाऱ्या समद एजाज अहमद हिंदुस्थानवाला (२३, रा. नयापुरा) या संशयितास आझादनगर पोलिसांनी रात्री अटक केली. काय घडले नेमके?

तरुणीचा पाठलाग करून रस्त्यात अडवत म्हणाला...

पीडित तरुणीने २० जुलैला या संदर्भात तक्रार दिली होती. संशयिताने डाॅक्टर तरुणीचा पाठलाग करून रस्त्यात अडवत ‘तू मुझे पसंद है, मै तुझसे शादी करना चाहता हूॅं’ असे म्हणून तिचा हात धरत विनयभंग केला. शिवीगाळ केली. तिच्या होणाऱ्या पतीला पीडित तरुणीशी मी प्रेम करतो, तू लग्न करू नको; अन्यथा ठार मारेन, असा दम दिला होता. तसेच पीडित मुलीच्या वडिलांना व्हॉट्सॲपवर वेळोवेळी मेसेज पाठवूनही त्रास दिला होता. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला
 
दोन दुचाकींची चाेरी 

शहरातील आयेशानगर कब्रस्तान नजीकच्या रिलायबल सायजिंगजवळून शेख मुजीफ शेख हसन (रा. देवीचा मळा) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१ एई ७३३८) चोरट्यांनी लंपास केली. तब्बल पाच दिवस शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने मुजीफ शेख यांनी आयेशानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वैद्य हॉस्पिटलसमोर दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार घडला. शेखर भावसार (५२, रा. कलेक्टरपट्टा) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१ यु ६२०३) चोरट्यांनी तीन दिवसांपूर्वी लांबविली. छावणी पोलिस ठाण्यात भावसार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor molested case malegaon nashik marathi news