महिलेशी लगट करत थेट लैंगिक सुखाची मागणी; डॉक्टरवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

रात्रीची वेळ दाढीच्या दुखण्याने तिला वेदना असह्य... सासऱ्यांना घेऊन उपचारासाठी दवाखान्यात आली. कोरोना साथीचे कारण सांगत तुम्ही बाहेर बसा म्हणून त्यांना बाहेर बसवलं...अन् संधीचा फायदा घेत हा धक्कादायक प्रकार केल्याची घटना घडली. 

नाशिक : (येवला) रात्रीची वेळ दाढीच्या दुखण्याने तिला वेदना असह्य... सासऱ्यांना घेऊन उपचारासाठी दवाखान्यात आली. कोरोना साथीचे कारण सांगत तुम्ही बाहेर बसा म्हणून त्यांना बाहेर बसवलं...अन् संधीचा फायदा घेत हा धक्कादायक प्रकार केल्याची घटना घडली. 

अशी आहे घटना

सप्तशृंगी मंदिरासमोरील संकुलातील डॉ. महेश जोशी यांच्या दातांच्या दवाखान्यात गुरुवारी (ता.21) रात्री आठला एक विवाहित महिला सासऱ्यासमवेत दाढ दुखत असल्याने उपचारासाठी आली. दाढीची तपासणी करताना डॉक्‍टरने संबंधित महिलेच्या सासऱ्याला कोरोना साथीचे कारण देत बाहेर जाण्यास सांगितले. तपासणी करताना या डॉक्‍टरने या महिलेशी लगट करत थेट लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिला तत्काळ रुग्णालयातून बाहेर पडली; पण बाहेर पडताना हा प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामीची धमकीही डॉक्‍टरांनी दिली. 

हेही वाचा > चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता

शुक्रवारी (ता.22) सकाळी पीडितेने आपल्याबरोबर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर पीडितेच्या नातेवाइकांनी याचा जाब डॉक्‍टरला विचारत त्यास चोप दिला. नंतर डॉक्‍टरविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयित डॉक्‍टरला ताब्यात घेतले. 

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor who molested her was beaten by her relatives in Yeola nashik marathi news