डॉक्‍टरच करताएत विलगीकरण कक्षाला विरोध? वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

भौतिक असुविधा व दाट लोकवस्तीचे कारण पुढे करत ठक्कर डोम येथील विलगीकरण कक्षाला परिसरातील डॉक्‍टरांनी विरोध केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यात आमचा सहभाग राहणार असला, तरीही कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून ठक्कर डोमबद्दल पुनर्विचार करावा, असेही डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 

सकाळ वृत्तसेवा 
नाशिक ः
भौतिक असुविधा व दाट लोकवस्तीचे कारण पुढे करत ठक्कर डोम येथील विलगीकरण कक्षाला परिसरातील डॉक्‍टरांनी विरोध केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यात आमचा सहभाग राहणार असला, तरीही कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून ठक्कर डोमबद्दल पुनर्विचार करावा, असेही डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 

 डॉक्‍टरच करताएत विलगीकरण कक्षाला विरोध?

नाशिकच्या ठक्कर डोममधील कोरोना विलगीकरण कक्ष स्थलांतरणाबद्दल चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितली आहे. मात्र, ही वेळ अद्याप मिळाली नसल्याचे डॉक्‍टरांनी म्हटले आहे. पर्यायी सुरक्षित जागेत कक्ष स्थलांतरित केल्याने आरोग्य राखले जाईल, अशी भूमिका मांडून डॉक्‍टर म्हणाले, की ठक्कर डोम भागात मल-मूत्र विसर्जनाची योग्य व कायमस्वरूपी व्यवस्था नाही. डोमच्या परिसरात भिंती नाहीत. वरच्या बाजूने पत्र्याचे छतही नाही. त्यामुळे या परिसरातील व्यवस्था कोरोना रुग्णांसाठी घातक आहे. आतापर्यंतच्या पाहणीनुसार कोरोना हा विषाणू पाण्याच्या संपर्कात वाढताना दिसतो.

धोकेदायक परिस्थिती प्रशासनापुढे

ठक्कर डोम ही जागा मोक्‍याच्या रस्त्यावर आहे. सिटी सेंटर मॉलचा हा रस्ता आहे. लगत तीन मोठी रहिवासी संकुले आहेत. शिवाय सिडको ही दाट लोकवस्ती जवळ आहे. रस्त्याच्या पलिकडे महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण संस्था आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून वैद्यकीयदृष्ट्या धोकेदायक परिस्थिती प्रशासनापुढे ठेवण्यात आली आहे. तात्पुरत्या शौचालय आणि स्वच्छतागृहातून व्यवस्था होणार नाही. अनेक आजारांना या परिसराला सामोरे जावे लागेल. ​डॉ. विक्रांत जाधव, डॉ. रोहन काश्‍यपे, डॉ. राजेंद्र ठिगळे, डॉ. अमोल वानखेडे, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. उषा जोशी हे ठक्कर डोमच्या परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पाठविले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ
 
लोकवस्तीपासून कक्ष असावा दूर 
कोरोना विलगीकरण कक्ष लोकवस्तीपासून दूर असायला हवा. जेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणाचा उपयोग करून घेतला गेल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना धोका होणार नाही, ही बाब महापौरांनी पर्याय सूचावयाला सांगितल्यावर स्पष्ट करण्यात आली असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यात आमचा सहभाग राहणार असला, तरीही कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून ठक्कर डोमबद्दल पुनर्विचार करावा, असेही डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors oppose the segregation room nashik marathi news