खळबळजनक! निमा हाउसमधून कागदपत्रे गहाळ...पदाधिकारी संशयाच्या फेऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

गेल्या हप्ताभरापासून निमातील निवडणुकीचे वातावरण तापत असून, रविवारी (ता. 28) निमातील कपाटाचे सील तोडून निमाचे पदाधिकारी तुषार चव्हाण यांनी कागदपत्रे बाहेर नेल्याप्रकरणी निवडणूक कमिटीने सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकाराने निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. 

नाशिक/सातपूर : गेल्या हप्ताभरापासून निमातील निवडणुकीचे वातावरण तापत असून, रविवारी (ता. 28) निमातील कपाटाचे सील तोडून निमाचे पदाधिकारी तुषार चव्हाण यांनी कागदपत्रे बाहेर नेल्याप्रकरणी निवडणूक कमिटीने सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकाराने निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. 

संबंधित कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप

काही दिवसांपासून जिल्ह्याचे लक्ष लागून आसलेल्या नाशिक इंडस्ट्रीज ऍन्ड मॅन्युफॅक्‍चर असोसिएशनच्या निवडणुकीबाबत आरोप- प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाल्या आहेत. त्यात निमाच्या विश्‍वस्त कमिटीने काही दिवसांपूर्वी निमाचा ताबा घेत सर्व दप्तर सील करून अध्यक्ष व सरचिटणीस यांना केबिन सोडण्याचे आदेश दिले होते, पण या कृतीचा अध्यक्ष शशिकांत जाधव व सरचिटणीस तुषार चव्हाण, प्रदीप पेशकर, श्रीपाद कुलकर्णी आदींनी पलटवार करत संबंधित कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप करून उत्तर दिले होते. त्यातच रविवारी निवडणूक निर्णय कमिटीने निमातील सील केलेल्या कपाटातील कागदपत्रे निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी नेल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीत निवडणूक कमिटीचे अध्यक्ष डी. जी. जोशी, मधुकर ब्राह्मणकर, ज्ञानेश्‍वर गोपाळे, राजेंद्र छाजेड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

संबंधित तक्रार खोटी असून, उलट यांनीच निमाचा अनधिकृतपणे ताबा घेत सर्व दप्तर जमा करून घेतले आहे. आज मात्र ही कृती बेकायदेशीर असल्याने हे त्यांच्या अगलट येणार असल्याचे लक्षात आल्याने खोट्या तक्रारी करून "उलटा चोर कोतवाल को डाटे' असा प्रकार करत आहेत. - तुषार चव्हाण, सरचिटणीस, निमा

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The documents in the cupboard in Nima House are lost nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: