दिवसेंदिवस वस्तीवर कुत्रे झाले दिसेनासे; कारण समजताच ग्रामस्थांचा उडाला थरकाप

अजित देसाई 
Monday, 23 November 2020

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात उजनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून   गोसावी बाबा मंदिर परिसरातील अनेक वस्त्यांवरील कुत्री बेपत्ता होत असल्याने शेतकरी चिंतित झाले होते. त्यांना जेव्हा अचानक कुत्री गायब होण्यामागील कारण समजले तेव्हा मात्र त्यांचा थरकाप उडाला, नेमके काय घडले वाचा..

नाशिक/ सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात उजनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून   गोसावी बाबा मंदिर परिसरातील अनेक वस्त्यांवरील कुत्री बेपत्ता होत असल्याने शेतकरी चिंतित झाले होते. त्यांना जेव्हा अचानक कुत्री गायब होण्यामागील कारण समजले तेव्हा मात्र त्यांचा थरकाप उडाला, नेमके काय घडले वाचा..

मागच्या काही दिवसात परिसरातील 12 ते 15 कुत्री अचानक बेपत्ता झाली.  त्यानंतर सुरसे वस्ती येथे राम सुरसे यांच्या चंदन बागेच्या परिसरात पाणी भरलेल्या शेतात त्यांनी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. सुरसे यांनी सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना मोबाईलवर या पावलांचे ठसे पाठवले. हे ठसे बिबट्याच्या पावलांचे असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट करत परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले होते.

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

शेतमजुराला प्रत्यक्ष दर्शन 

आज (दि. 23)  सकाळी सात वाजेच्या सुमारास परिसरातील एका शेतमजुराला मारलेल्या कुत्र्यावर ताव मारणारा बिबट्या आढळून आला. शेतमजुराची चाहूल लागल्याने बिबट्याने आपली शिकार ऊसाच्या शेतात ओढून नेली. हा प्रकार समजल्यावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी एका शेतमजुराला बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने घबराट पसरली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा असे पत्र वनविभागास दिले आहे.

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार

 

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dogs in the area disappeared in Ujani area nashik marathi news