माहेरून पैसे आणले नाही म्हणून...विवाहितेच्या छळाच्या दोन घटना 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

महिलांना बहुतांश त्रास हा घरातून आणि नात्यातल्या माणसांकडूनच होतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक, हुंडय़ासाठी छळ, मालमत्तेसाठी छळ, शाब्दिक अपमान, शिवीगाळ, हिणवणं धमकावणं हे सर्व कौटुंबिक हिंसाचारात येतं. ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण’ या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून दाद मागता येते.

नाशिक : ट्रक घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून येथील माहेरवाशीण असलेल्या ज्योती आहेर (वय २४, रा. जोरण, ता. बागलाण) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणारा पती रिंकल नंदकुमार आहेर याच्यासह सासरकडील चौघांविरुद्ध येथील तालुका पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. वर्षभरापासून पाच लाखांसाठी छळ सुरू होता, असे ज्योतीने तक्रारीत म्हटले आहे. 

दुसरी घटना...
खडकी (ता. मालेगाव) येथील माहेरवाशीण शीतल अहिरे (वय २४) या विवाहितेचा शेती विकसित करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ व छळ करणारा पती रामदास अहिरे याच्यासह सासरकडील सारदे (ता. बागलाण) येथील चौघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

कौटुंबिक छळ आणि हिंसाचार संदर्भातला कायदा काय म्हणतो ?

महिलांना बहुतांश त्रास हा घरातून आणि नात्यातल्या माणसांकडूनच होतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक, हुंडय़ासाठी छळ, मालमत्तेसाठी छळ, शाब्दिक अपमान, शिवीगाळ, हिणवणं धमकावणं हे सर्व कौटुंबिक हिंसाचारात येतं. ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण’ या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून दाद मागता येते. 17 ऑक्टोबर 2006 रोजी या कायद्याची तरतूद करण्यात आली. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार महिलांना तीन पातळ्यांवर करता येते. जिल्हा महिला बालकल्याण विभागातल्या संरंक्षण अधिकारी, समाजकल्याण अंतर्गत सेवा पुरविणारे कौटुंबिक सल्ला केंद्र आणि पोलीस दंडाधिकारी यांच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवता येते. 

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: domestic violence of married woman nashik marathi news

टॉपिकस
Topic Tags: