esakal | काय सांगता.. वेतन कपातीच्या जमान्यात 'त्यांना' दुप्पट वेतनवाढीची लॉटरी..!
sakal

बोलून बातमी शोधा

mukti

लॉकडाऊन लागल्यापासून देशातील अनेक खाजगी कंपन्या आणि घरगुती कामगारांपर्यंत सर्वांवरच वेतनकपातीला सामारे जावे लागत आहे तर अनेकांच्या हातचा रोजगार गेला. मात्र अशा परिस्थितीतही जर वेतनवाढ मिळाली तर सांगालयाच नको. 

काय सांगता.. वेतन कपातीच्या जमान्यात 'त्यांना' दुप्पट वेतनवाढीची लॉटरी..!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक / येवला :  येथील ऐतिहासिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्‍क्‍तभूमी स्मारकाची देखभाल व स्वच्छता ठेवण्याकरीता शासनामार्फत ठेकेदारी पद्धतीने 20 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांना वेळेवर दिले जात नव्हते. मानधन वेळेवर आणि वाढविण्याकरीता या कर्मचाऱ्यांकडून सतत आंदोलन केले जात होते. समाजकल्याण विभागाच्या बार्टी संस्थेकडून सुरक्षेसंदर्भात खाजगी कंपनीच्या माध्यमातून नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविल्याने येथील कामगारांनी 27 डिसेंबर 2019 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

मानधनवाढीचा प्रश्‍न आता मार्गी

यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ बार्टीच्या महासंचालकांना सूचना केल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेत भुजबळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे महासंचालक कैलास कणसे यांच्या आदेशानुसार मे. ब्रिस्क इंडीया प्रा.लि. या नवीन कंपनीमध्ये मुक्‍तीभूमी येथील 20 कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2020 रोजी बार्टी मार्फत वर्ग करण्यात आल्याने आता कर्मचारी वर्गाचा सुरळीत मानधनाचा व मानधनवाढीचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

दुरुस्ती व सुशोभीकरणाकडेही लक्ष
 येथील मुक्तिभुमी व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी पदावर पल्लवी पगारे यांची मागील वर्षी नियुक्ती झाली असून त्यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमासह मुक्तीभूमीची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. सुरळीत मानधनाचा व मानधनवाढीचा प्रश्न मागी लागला. वेतनप्रश्नी येथील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, निबंधक यादव गायकवाड, सहा. प्रकल्प संचालक सुभाष परदेशी, लक्ष्मीकांत महाजन, व्यवस्थापक पल्लवी पगारे, कंपनीचे व्यवस्थापक प्रविण प्रभुणे, मनोज गायकवाड आदींचे आभार व्यक्त केले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

go to top