अभिमानास्पद! डॉ. नाईक यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद; अशक्य डेंटल ट्रीटमेंट करून रचला विश्‍वविक्रम

प्रशांत कोतकर
Sunday, 11 October 2020

नाशिकमधील डॉ. शुभम नाईक यांनी अलीकडेच एक अशक्य डेंटल ट्रीटमेंट करून विश्‍वविक्रम केला आणि त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली आहे. डॉ. नाईक यांनी हा विक्रम कमीत कमी माउथ ओपनिंगमध्ये नॉनसर्जिकल पद्धतीने अक्कलदाढ काढून केला आहे. 

नाशिक : नाशिकमधील डॉ. शुभम नाईक यांनी अलीकडेच एक अशक्य डेंटल ट्रीटमेंट करून विश्‍वविक्रम केला आणि त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली आहे. डॉ. नाईक यांनी हा विक्रम कमीत कमी माउथ ओपनिंगमध्ये नॉनसर्जिकल पद्धतीने अक्कलदाढ काढून केला आहे. 

अशक्य डेंटल ट्रीटमेंट करून रचला विश्‍वविक्रम 

सामान्यतः अक्कलदाढ ही सर्जिकल किंवा नॉनसर्जिकल पद्धतीने काढली जाते. नॉनसर्जिकल पद्धतीने अक्कलदाढ काढण्यासाठी कमीत कमी माउथ ओपनिंग २०-२५ मिमीची लागते. मात्र, डॉ. नाईक यांनी १५ मिमी माउथ ओपनिंगमध्ये स्वतःची पद्धत विकसित करून नॉनसर्जिकल पद्धतीने अक्कलदाढ काढून विश्‍वविक्रम केला. नॉनसर्जिकल असल्यामुळे कोणत्याही प्रकारची चीर किंवा टाके द्यावे लागले नाहीत. यामुळे जखमही लवकर भरली गेली. डॉ. नाईक यांना यापूर्वी या वर्षीचा ग्लोबल आउटरिच हेल्थकेअर ॲवॉर्ड प्राप्त झाला. तसेच इंटरनॅशनल डेंटल एस्कीसन्स ॲवॉर्ड २०१८ आणि भारतीय दंतशाखेतील सर्वांत प्रतिष्ठित मानला जाणारा फॅमडेंट अर्थात, इंडियन डेंटल ऑस्कर २०१८ हे दोन पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Naiks world record Entry in India Book of Records nashik marathi news