esakal | आश्चर्यच! जगभरातील सुमारे ५१ हजार नामवंतांच्या सह्या.! डॉ. सोनींची लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

dr soni.jpg

देशातील सर्व राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या फोटोवरील सह्या त्यांच्या संग्रहात आहेत. संग्रहाच्या निमित्ताने 20 देशांचे राष्ट्रपती मूळचे भारतीय असून, मॉरिशसचे राष्ट्रपती अनिरुद्ध जगनाथ बिहारमधील होते. तसेच त्यांच्या संग्रहात इंदिरा गांधी यांनी लिहिलेले पत्र असल्याचेही डॉ. सोनी यांनी सांगितले. 

आश्चर्यच! जगभरातील सुमारे ५१ हजार नामवंतांच्या सह्या.! डॉ. सोनींची लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील डॉ. सर्वेश सोनी यांच्या स्वाक्षरी संग्रहाची नोंद लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी जगभरातील 51 हजार 336 नामवंतांच्या सह्यांचा संग्रह केला आहे. सलग दहा वर्षे त्यांनी लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नाव कोरून "रेकॉर्ड' केले. 

लिम्का बुक रेकॉर्डमध्ये "रेकॉर्ड'
डॉ. सोनी यांच्या संग्रहात भारतीय 14 हजार 50 आणि 37 हजार 286 विदेशातील व्यक्तींच्या सह्या आहेत. त्यांच्या संग्रहातील 70 टक्के सह्या राजकारणी क्षेत्रातील व्यक्तींच्या आहेत. दोनशे देशांतील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सह्यांचा खजिना त्यांच्याकडे आहे. आइन्स्टाईन यांच्या पहिल्या सहीने त्यांनी संग्रहाची सुरवात केली. देशातील सर्व राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या फोटोवरील सह्या त्यांच्या संग्रहात आहेत. संग्रहाच्या निमित्ताने 20 देशांचे राष्ट्रपती मूळचे भारतीय असून, मॉरिशसचे राष्ट्रपती अनिरुद्ध जगनाथ बिहारमधील होते. तसेच त्यांच्या संग्रहात इंदिरा गांधी यांनी लिहिलेले पत्र असल्याचेही डॉ. सोनी यांनी सांगितले. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

कोणाकोणाच्या सह्या...
जगातील तब्बल 30 वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये डॉ. सोनी यांचे नाव कोरले गेले आहे. जगातील पहिल्या महिला राष्ट्रपती अर्जेंटिनाच्या मारिया यांचे तुरुंगातून लिहून पाठविलेले पत्र त्यांच्या संग्रहात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि विनोबा भावे यांच्या फोटोवर दोघांनी सह्या केल्या आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मॅरेडोना, दलाई लामा, नेल्सन मंडेला, मिखाईल गोर्बाचेव्ह यांची छायाचित्रे आणि सही त्यांनी जपून ठेवली आहे. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

संग्रहालय सुरू करण्याची इच्छा
कोलकोत्यामधून 1842 मध्ये प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र, कागदापूर्वी कातडीवर लेखन केले जात असल्याने त्यावरील सही जपून ठेवली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची हिंदीतील सही आहे. जग आणि भारत अशी 200 पुस्तके प्रकाशित आहेत. भविष्यात नाशिकमध्ये लघुविश्‍व संग्रहालय सुरू करण्याची इच्छा आहे. -डॉ. सर्वेश सोनी