नवनियुक्त पोलिस अधीक्षकांचा दणका! अवैध धंद्यावरुन दोघे निलंबित, निरीक्षकांसह सहा जणांच्या बदल्या

विनोद बेदरकर
Saturday, 10 October 2020

अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या येवल्यातील पोलिस आधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांनी दणका देत, दोघांना निलंबित केले तर सहा जणांच्या येवल्यातून नाशिकला जिल्हा पोलिस मुख्यालयात बदल्या केल्या. वाचा सविस्तर

नाशिक : अवैध धंद्याच्या तक्रारी असल्यास संबधित पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार धरला जाईल. असा इशारा देउनही अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या येवल्यातील पोलिस आधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांनी दणका देत, दोघांना निलंबित केले तर सहा जणांच्या येवल्यातून नाशिकला जिल्हा पोलिस मुख्यालयात बदल्या केल्या. वाचा सविस्तर

असा आहे प्रकार

येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना फोन करुन त्यांचा मुलगा अवैध दारु धंद्यामुळे वाया गेला आहे. त्यामुळे म्हातारपणात शेतकरी पती-पत्नीवर वाईट दिवस आल्याचे सांगितले. या दाम्पत्याने येवला तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याने कुटुंब कसे बरबाद होत आहे. याची कर्मकहाणी ऐकविली. पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी त्वरीत खातरजमा करतांना पथक पाठवून तेथील अवैध धंद्यावर कारवाई करीत अवैध धंदा बंद केलाच. पण कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरु ठेवल्याबद्दल बीट अंमलदार त्यांनी त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेउन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव, पोलिस नाईक योगेश पाटोळे, यांना निलंबित करण्यात आले. 

हेही वाचा >  दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा

पहिल्याच आठवड्यात पोलिस अधीक्षकांचा दणका

पोलिस ठाण्याचे प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांची तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली. तर येवला स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड आणि भाउसाहेब टिळे आणि विशाल आव्हाड अशा सहा जणांची येवला येथून नाशिकला जिल्हा ग्रामीण मुख्यालयात बदली केली आहे. श्री पाटील यांनी पदभार घेताच, अवैध धंद्याबाबत त्या त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी आधिकारी जबाबदार धरला जाईल असे स्पष्ट केले होते. तसेच जिल्ह्यातील शेतकरी थेट मोबाईलवर संर्पक साधू शकतील असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या आठवड्यात पोलिस अधीक्षकांनी दणका दिला. 

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSP suspended both for illegal business Transfers of six persons nashik marathi news