रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याऱ्या अंड्याचे भाव कडाडले! आणखी भाव वाढण्याची दाट शक्यता

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Saturday, 10 October 2020

रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कोरोना काळात अंड्यांचा जास्त आहारात समावेश करण्यात आला. उकडून अंडे खाण्याला ज्यादा पसंती दिली गेली. पण आता याच अंड्याचे भाव वाढत असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. 

नाशिक : रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कोरोना काळात अंड्यांचा जास्त आहारात समावेश करण्यात आला. उकडून अंडे खाण्याला ज्यादा पसंती दिली गेली. त्यामुळे आता अंड्यांना मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण आता याच अंड्याचे भाव वाढत असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. 

कोरोनामुळे अंड्यांची मागणी वाढली

कोरोना आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सध्या अंड्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. म्हणून मागणी जास्त झाल्यामुळे पुरवठा हा कमी झाला आहे. अंड्यांचे उत्पादन स्थिर राहील्यामुळे सध्या अंड्यांच्या किमती वाढले आहेत होलसेल ला ७४ रुपये तर रिटेलला ८४ रुपये भाव सध्या अंड्याचा असून काही दिवसातच हा भाव वाढण्याची शक्यता आहे.अंडयांचा पुरवठा हा स्थिर आहे, मात्र अंड्यांची मागणी वाढल्यामुळे अंड्यांचे भाव सध्या गगनाला भिडत आहे. काही दिवसातच हे भाव वाढण्याची दाट शक्यता अंडे व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

 

सध्या अंड्यांचे भाव वाढत आहे कोरोनामुळे अंडी खाणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत असून हे अंड्यांचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे - प्रमोद भालेराव अंडी विक्रेता

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eggs price increased due to Corona nashik marathi news