शहरात जमावबंदीचा आदेश धाब्यावर...तब्बल 'इतक्या' लोकांविरुध्द गुन्हे दाखल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

गेल्या मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु तर 23 मार्चपासून ते आत्तापर्यंत टप्प्याने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाऊन हे अत्यंत कठोर स्वरुपाचे तर चौथ्या लॉकडाऊनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत.

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या तीन महिन्यातील लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणे अनेकांचा चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील तब्बल इतक्या हजार नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले असून, सुमारे दोन हजारांहून अधिक वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. 

रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम

गेल्या मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु तर 23 मार्चपासून ते आत्तापर्यंत टप्प्याने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाऊन हे अत्यंत कठोर स्वरुपाचे तर चौथ्या लॉकडाऊनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यात तब्बल साडेआठ हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आता, सर्वच दुकाने सुरू झाल्याने अनेक नागरिक जीवनावश्‍यक वस्तुंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत.

सर्वाधिक गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल

काही बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस अद्यापही कारवाई करीत आहेत. त्यानुसार परिमंडळ एकच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 5 हजार 249 तर, परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 3 हजार 170 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक 1 हजार 313 गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाणे, तर त्याखालोखाल 1 हजार 280 गुन्हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे, शहर पोलिसांनी 2 हजार 213 वाहनेही जप्त केली आहेत. यात सर्वाधिक 295 वाहने नाशिकरोड, त्याखालोखाल 292 वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉण्डद्वारे परत केली जात आहेत. 

मास्क न वापरणारेही अडकले.. 

त्याचप्रमाणे, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात मास्कचा वापर बंधनकारक आहे. असे असले तरीही मास्कचा वापर न करणारे 1 हजार 587 नागरिकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच,  लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं?...जीवाची होत होती घुसमट...अन् घेतला अखेरचा निर्णय

 पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात गुन्ह्यांची संख्या) 

भद्रकाली (808), सरकारवाडा (1313),

गंगापूर (1280), आडगाव (307), म्हसरुळ (241),

पंचवटी (363), मुंबईनाका (937), अंबड (493),

इंदिरानगर (464), सातपूर (745), उपनगर (504),

नाशिकरोड (555), देवळाली कॅम्प (409)

हेही वाचा > धक्कादायक! बायकोच्या चारित्र्यावर संशय...नवऱ्यानेच मारण्याची दिली सुपारी..अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight and a half thousand crimes in the nashik city lockdown nashik marathi news