नाशिक रोडला आठ कोर्ट एकाच जागी! महिनाअखेर स्थलांतर; विविध वैशिष्ट्यांचा समावेश

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Wednesday, 14 October 2020

साडेचौदा कोटी रुपये खर्चून नाशिक रोड कोर्टची नवीन इमारत विक्रमी दोन वर्षांच्या कालावधीतच तयार झाली आहे. की नवीन कोर्ट जागेत ४२ हजार चौरस फुटाचे सुसज्ज न्यायालय आहे.  से नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड यांनी सांगितले.

नाशिक रोड : येथील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी न्यायालयाची इमारत तयार झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमध्ये अंतर राहावे, यासाठी या महिनाभरात दुर्गा गार्डनजवळ आठ कोर्ट या इमारतीत येणार असल्याचे वकील संघाचे सुदाम गायकवाड यांनी सांगितले. 

नाशिक रोडला आठ कोर्ट एकाच जागी 
साडेचौदा कोटी रुपये खर्चून नाशिक रोड कोर्टची नवीन इमारत विक्रमी दोन वर्षांच्या कालावधीतच तयार झाली आहे. नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड यांनी सांगितले, की नवीन कोर्ट जागेत ४२ हजार चौरस फुटाचे सुसज्ज न्यायालय आहे. वायू व ध्वनिप्रदूषणापासून मुक्ती, अंतर्गत रस्ते, प्रशस्त पार्किंग, आकर्षक उद्यान, न्यायाधीश व इतर कक्षांमध्ये अद्ययावत फर्निचर, चारही बाजूंनी संरक्षक भिंत ही या कोर्टची वैशिष्ट्ये आहेत. दोन मजली बांधकाम झाले असले तरी चार मजल्यांपर्यंत बांधकामाची तजवीज आहे. येथे एकूण आठ कोर्ट आहेत. म्हणजेच सध्यापेक्षा पाच कोर्ट जास्त आहेत. कॉमन बार रूम असून, त्यामध्ये सुमारे सत्तर वकील एकावेळी बसू शकतात.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

महिनाअखेर स्थलांतर; दोन वर्षांत इमारतीची उभारणी 

भविष्यात येथे वरिष्ठ स्तर न्यायालय येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सिन्नरचे वरिष्ठ स्तराचे दावे नाशिक रोड कोर्टात येऊ शकतात. त्यामुळे नाशिकला जाण्याची गरज भासणार नाही. नाशिक रोड वकील संघ नऊ वर्षांपासून नव्या कोर्टसाठी प्रयत्नशील होता. नवीन कोर्टचे बजेट सव्वासात कोटींचे होते. मधल्या काळात वेळ गेल्यामुळे ते साडेचौदा कोटीवर गेले. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे, जिल्हा न्यायाधीश शिंदे, तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते २८ जुलै २०१८ ला भूमिपूजन झाले. आता कोरोनामुळे दोन व्यक्तींमध्ये सामाजिक आंतर राहावे आणि न्यायव्यवस्था मध्यवर्ती व्हावी, या उद्देशाने वकील संघाच्या प्रयत्नाने या महिनाअखेरीस न्यायालयाचे स्थलांतर ठरले असल्याचे  गायकवाड यांनी ‘सकाळ’ला सांगितले.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight courts on Nashik Road in one place marathi news