अठरा वर्षाच्या युवकाच्या जीवनात असे काय झाले...की आत्महत्येचे उचलले पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

बागलाण तालुक्यातील साकोडे ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे गावात प्रचंड खळबळ माजली आहे. एका १८ वर्षीय तरुणाने आयुष्यातील टोकाचे पाऊल उचलले असून त्याने हा निर्णय का घेतला किंवा याच्यामागे कोणाचे कट कारस्थान होते याबाबत अद्यापही अस्पष्टताच आहे.

नाशिक / डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील साकोडे ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे गावात प्रचंड खळबळ माजली आहे. एका १८ वर्षीय तरुणाने आयुष्यातील टोकाचे पाऊल उचलले असून त्याने हा निर्णय का घेतला किंवा याच्यामागे कोणाचे कट कारस्थान होते याबाबत अद्यापही अस्पष्टताच आहे.

असा घडला प्रकार

रवींद्र यशवंत साबळे या अठरा वर्षीय तरुणाने त्याच्या राहत्या घराच्या काही अंतरावरील गोविंदा वाधू गायकवाड यांच्या शेतीतील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.(ता.२७) सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने साकोडेचे कामगार पोलीस पाटील नंदन देवाजी देशमुख यांनी सटाणा पोलिसांना याबाबतची खबर दिली. यानंतर सटाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच

डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सटाणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे .या तरुणाने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने घटनेचा तपास सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. प्रकाश जाधव पोलीस हवा. जयंतसिंग सोळंके,राहुल शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighteen years boy suicide at sakode nashik marathi news