''आमच्यात इतरांना स्थान नकोच!'' एकलव्य संघटनेचा धनगर समाजाला विरोध

संतोष विंचू
Wednesday, 7 October 2020

धनगर हि वेगळी जमात असून त्यांचा व धनगर समाजाचा कोणताही संबध नाही. आर्थिक व राजकीयदृष्ट्या संघटीत असल्याने धनगर समाजाचे काही नेते आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेऊन स्वतःच्या समाजाची फसवणूक करत आहेत, असे आरोप आणि दावे एकलव्य संघटनेने केले आहेत. 

नाशिक : (येवला) विकास, शिक्षण अन समाजिक पटलावर आजही आदिवासी समाज मागासलेला आहे. त्यामुळे आम्हीच आदिवासी, आमच्यात इतरांना स्थान नकोच.. असा नारा देत अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये यासाठी एकलव्य संघटनेने मंगळवारी (ता.६) दुपारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत युवा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. 

आदिवासींच्या आरक्षणावर डोळा

निवेदनात आदिवासी परंपरा व धनगर समुदायाच्या परंपरा यात मूलभूत फरक आहे. उत्तर भारतीय धनगड जातीच्या नाम साधर्म्याचा फायदा घेऊन आदिवासी अनुसूचित असल्याचा दावा केला जातो, तो चुकीचा आहे. धनगड हि वेगळी जमात असून त्यांचा व धनगर समाजाचा कोणताही संबध नाही. आर्थिक व राजकीयदृष्ट्या संघटीत असल्याने धनगर समाजाचे काही नेते आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेऊन स्वतःच्या समाजाची फसवणूक करत आहेत, असे आरोप आणि दावे एकलव्य संघटनेने केले आहेत. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

आदिवासी समाजाशिवाय कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, अशी मागणी यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी एकलव्य संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष शांताराम पवार, युवा अध्यक्ष बाबा पवार, मारुती मोरे, नाना पिंपळे, सोमनाथ पवार, साईनाथ मोरे, रावसाहेब सुरासे, विजय माळी, श्रीरंग मोरे, खंडू मोरे, अण्णा मोरे, वाल्मिक माळी, विनोद मोरे, संदीप माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eklavya organization strongly opposes the dhangar society nashik marathi news