तारूण्य गेले, स्मृतीही गेल्या...तरीही ताठ मानेने गातोय 'शिवसेना गीत'? वयोवृद्ध कार्यकर्त्याची रस्त्यावर भटकंती

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अकोला जिल्ह्यातील एक कट्टर शिवसैनिक आजमितीस नाशिकच्या रस्त्यांवर स्वरचित शिवसेना गिते गातांना बघावयास मिळत आहेत. वृद्धापकाळ व स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्यांच्यावर ही वेळ आणलीय...

नाशिक : (सिडको) एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अकोला जिल्ह्यातील एक कट्टर शिवसैनिक आजमितीस नाशिकच्या रस्त्यांवर स्वरचित शिवसेना गिते गातांना बघावयास मिळत आहेत. वृद्धापकाळ व स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्यांच्यावर ही वेळ आणलीय...

शिवसेनेवर व गजानन महाराजांवर उत्तमोत्तम गीत

आपल्या जन्मभूमीत जाण्यास व्याकुळ असलेले हे वयोवृद्ध कार्यकर्ते लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अडकून पडले आहेत. दिलीप खुशीराम शर्मा (वय ७०) असे त्यांचे नांव असून, ते राऊतवाडी (अकोला) येथील रहिवासी आहेत. लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अडकलेले असतानाच स्मृतिभ्रंशामुळे ते स्वरचित शिवसेना गिते गात रस्त्यांवरून फिरत आहेत. विशेष म्हणजे, अशाही परिस्थितीत त्यांना भेटल्यानंतर भल्या-भल्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात नाहीत. केवळ गॉडगिफ्ट असल्यामुळे आपण उत्तम गीतकार असल्याचे ते सांगतात.

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे देखील शर्मा फॅन

दिलीप शर्मा यांनी शिवसेनेवर व गजानन महाराजांवर उत्तमोत्तम गीत रचना केलेल्या असून, त्याचे सुंदर पद्धतीने गायनही ते करतात. त्यांनी लिहिलेल्या शिवसेनेवरील गीतांमुळे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हेे देखील त्यांचे फॅन आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांचे एक गीत पंकज उधास यांनीदेखील गायलेले असल्याचा दावा ते करतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गावी परत जायचे असल्याचाही ते आवर्जून उल्लेख करतात.

हेही वाचा > भरदुपारी चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; परिसरात खळबळ

श्री. शर्मा यांचे आवडते शिवसेना गीत

शिवसेना यह जो बनी है सफल
‘गुलाब’ कि मेहनत है यह लगन |
बालासाहेब के नक्षोकदम पे चलता है,
अब तो यह सारा जीवन ॥१॥
शिवसेना के दिल में यही अरमान,
भगवा झेंडा रखेगा तिरंगे की शान ।
माँ भवानी का लेकर चलो वरदान,
शिवसेना का यही है अंजाम॥२॥ 

हेही वाचा > आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly from Akola ShivSena activist wandering the streets of Nashik nashik marathi news