बोरिवलीमधील वृद्धाची नाशिकमध्ये आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

युनूस शेख
Sunday, 24 January 2021

सारडा सर्कल परिसरातील हॉटेलच्या रुममध्ये एका वृद्धाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही वृद्ध व्यक्ती बोरिवली येथील असून त्यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

जुने नाशिक : सारडा सर्कल परिसरातील हॉटेलच्या रुममध्ये एका वृद्धाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही वृद्ध व्यक्ती बोरिवली येथील असून त्यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अशी आहे घटना

राजेन वज्रलाल मेहता (६१, रा. बोरिवली ईस्ट, मुंबई) असे मृताचे नाव आहे. भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दोन दिवसापूर्वी ते हॉटेलमध्ये राहण्यास आले होते. शुक्रवारी (ता.२२) दिवसभर त्यांनी दार उघडले नाही. रात्री १० वाजेच्या सुमारास हॉटेलमधील कामगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी फोन घेतला नाही. पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांच्या उपस्थित हॉटेलचा दरवाजा तोडण्यात येऊन खात्री केली. मृत मेहता जमिनीवर पडले असल्याचे दिसले. रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिस हवालदार व्ही. जे. भोज तपास करत आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly man commits suicide in hotel room nashik marathi news