नातेवाईकांकडे रिक्षाने जाणे पडले लाख रुपयांना; सहप्रवासी महिलांचा धक्कादायक कारनामा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

वृद्ध महिला नातेवाईकांकडे जाण्यास निघाली. रिक्षाने प्रवासादरम्यान दोन सहप्रवासी महिलादेखील होत्या. थोडीसुद्धा भनक न लागू देता, त्या दोघींनी साधला डाव. नातेवाईकांकडे पोहचताच वृद्ध महिलेला धडकीच भरली. असं काय घडलं प्रवासादरम्यान?

नाशिक : वृद्ध महिला नातेवाईकांकडे जाण्यास निघाली. रिक्षाने प्रवासादरम्यान दोन सहप्रवासी महिलादेखील होत्या. थोडीसुद्धा भनक न लागू देता, त्या दोघींनी साधला डाव. नातेवाईकांकडे पोहचताच वृद्ध महिलेला धडकीच भरली. असं काय घडलं प्रवासादरम्यान?

अशी आहे घटना

शुक्रवारी (दि. १६) नातेवाइकांना भेटण्यासाठी रुख्मिनी नानाजी वाघ (वय ६९, रा. ओझर मिग ता. निफाड) शहरात आल्या होत्या. सीबीएस ते संभाजी चौक अशा रिक्षा प्रवासादरम्यान त्यांचासोबत धक्कादायक घटना घडली. सिडकोच्या ऑटोरिक्षातून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन सहप्रवासी महिलांनी त्यांना चांगलाच गंडा घातला. रुख्मिनी वाघ यांच्या पर्समधील लाख रुपयांच्या बांगड्या दोन भामट्या महिलांनी हातोहात लांबविल्या. ही घटना नातेवाइकांच्या घरी पोहचल्यानंतर उघडकीस आली. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. दिवसेंदिवस शहरात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे. प्रवासादरम्यानच थोडी सुद्धा भनक न लागू देता केलेल्या चोरीने वाघ कुटुंबियांना धक्काच बसला. या घटनेने पुरुष नव्हे तर महिला टोळी देखील चोरीत तरबेज असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The elderly woman was robbed by two women nashik marathi news