
सोमवारपासून देशातील मतदार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून पीडीएफ स्वरूपातील ओळखपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून वापरू शकणार आहे.
नाशिक : देशभर सोमवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला. यानिमित्ताने निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराला ऑनलाइन निवडणूक ओळखपत्र काढण्याची सोय केली आहे. मात्र, ऑनलाइन ओळखपत्र मोबाईलवर डाउनलोड करून तो मोबाईल निवडणूक केंद्रावर नेता येईल का, याविषयी मात्र तूर्तास तरी निवडणूक आयोगाचे आदेश नाहीत. त्यामुळे ऑनलाइन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागणार आहे.
मोबाईल किंवा डेस्कटॉपवर ओळखपत्र डाउनलोड करता येणार
निवडणूक आयोगाने (ई-इपिक) सुविधा सुरू केली आहे. मतदार केंद्रावर लागणारे ओळखपत्र आतापर्यंत निवडणूक विभागाकडून प्रत्यक्ष दिले जात होते. मात्र, सोमवारपासून देशातील मतदार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून पीडीएफ स्वरूपातील ओळखपत्र डाउनलोड करून
त्याची प्रिंट काढून वापरू शकणार आहे. विशेषत: नवमतदारांना त्यांच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपवर ओळखपत्र डाउनलोड करता येणार आहे.
सध्या सोमवारपासून ते येत्या ३१ जानेवारीपर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यात नावनोंदणी, मोबाईल क्रमांक जोडलेल्या नवमतदारांना एसएमएसद्वारे लिंक येईल. १ फेब्रुवारीपासून मतदारांना लिंकद्वारे निवडणूक ओळखपत्र (ई-इपिक) डाउनलोड करता येईल.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
असे मिळवा ओळखपत्र
-https://nvsp.in संकेतस्थळावर लॉगिन करा.
-इपिक क्रमांक किंवा अर्जाचा संदर्भ टाकायचा.
-सिस्टिमद्वारे मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल.
-ओटीपी टाकून ओळखपत्र डाउनलोड करायचे.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच