ह्रदयद्रावक! स्पर्धा परीक्षेचे स्वप्न घेऊन सागरची अचानक एक्झिट; परिसरात हळहळ

प्रमोद पाटील
Wednesday, 28 October 2020

अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा सागर कोकाटे (वय २०)..जिद्द आणि मेहनतीवर काहीतरी मोठे करून दाखविण्याचे त्याचे स्वप्न आता कायमच अपूर्ण राहिल. कारण नियतीचा असा घाला आला की क्षणार्धात सर्व होत्याचे नव्हते झाले. आणि गावात अचानक ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकायला मिळाला.

चिचोंडी (जि.नाशिक) : अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा सागर कोकाटे (वय २०)..जिद्द आणि मेहनतीवर काहीतरी मोठे करून दाखविण्याचे त्याचे स्वप्न आता कायमच अपूर्ण राहिल. कारण नियतीचा असा घाला आला की क्षणार्धात सर्व होत्याचे नव्हते झाले. आणि गावात अचानक ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकायला मिळाला.

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न घेऊन सागरची अचानक एक्झिट

प्रगतिशील शेतकरी मोहन कोकाटे यांचा सागर मोठा मुलगा होय. अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सागरच्या अचानक जाण्याने साताळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साताळी (ता. येवला) येथील सागर कोकाटे (वय २०) मंगळवारी (ता. २७) दुपारी अडीचला शेतात मोटार सुरू करायला गेला असता त्यास विजेचा शॉक लागला. यामुळे बेशुद्ध झालेल्या सागरला त्याचे चुलते आप्पा कोकाटे यांनी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. संध्याकाळी सातला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सागरच्या अचानक जाण्याने साताळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electric shock Death of young boy in Satali nashik marathi news