महाराष्ट्र लोकसेवा आयोग नाशिकला अभियांत्रिकी परीक्षा केंद्रासाठी सकारात्मक! 

विनोद बेदरकर
Saturday, 10 October 2020

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक परीक्षा केंद्र आहे; पण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसेवा आयोगाकडे नाशिकला परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

नाशिक : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक परीक्षा केंद्र आहे; पण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसेवा आयोगाकडे नाशिकला परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील वर्षापासून नाशिकला ‘एमपीएससी’चे अभियांत्रिकी परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे खासदार गोडसे यांना कळविले. 

नाशिकला अभियांत्रिकी परीक्षा केंद्रासाठी आयोग सकारात्मक 
नाशिक येथे परीक्षा केंद्र सुरू झाले, तर उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. कोरोनाच्या काळात दूरच्या परीक्षा केंद्रांवर जाण्याच्या अडचणी १६ सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांची भेट घेऊन नाशिकला अभियांत्रिकी परीक्षेसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यापार्श्‍वभूमीवर लोकसेवा आयोगाने पुढील वर्षापासून नाशिक येथे अभियांत्रिकी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव सुनील औताडे यांनी खासदार गोडसे यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

उचित ती कार्यवाही करण्यात येईल,

या वर्षी १ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले असल्यामुळे ऐनवेळी बदल करणे शक्य नाही. या वर्षी मुबंई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या चार ठिकाणी ‘एमपीएससी’तर्फे अभियांत्रिकीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र पुढील वर्षापासून (२०२१) प्रशासकीय बाबींचा साकल्याने विचार करून नाशिकला परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन उचित ती कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. औताडे यांनी खासदार गोडसे यांना कळविले आहे.  

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineering examination will held in Nashik marathi news