विद्यार्थ्यांचे नुकसान नको...म्हणून माजी विद्यार्थ्यांनी लढविली 'अशी' शक्कल!

online-class.jpg
online-class.jpg

नाशिक : (नाशिक रोड) जिल्हा परिषदेची लाखलगाव शाळा बंद आहे...पण माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने मुलांना शिकवण्याचे काम सध्या सुरू आहे. गावातील ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यांना मोबाईलवर माजी  विद्यार्थी शिक्षण देत आहेत. तर ज्यांच्याकडे मोबाईल नाही, अशासाठी वेताळबाबा मंदिर आणि समाज मंदिरात माजी विद्यार्थी वर्ग घेऊन शिकवतात. गावातील मुलांच्या शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्यांचे प्रयत्न पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला आहे.

अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून अध्ययन

औरंगाबाद मार्गावरील लाखलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चारही वर्गातील विद्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होऊन शिक्षण घेत आहेत, अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून अध्ययन करत आहेत. शाळा बंद असताना गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी ठाकरे, बीट विस्ताराधिकारी भाऊसाहेब जगताप, केंद्रप्रमुख रमेश बैरागी, मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार, विजय जगताप, नीता कदम, शीतल पगार यांच्या मदतीने लाखलगावला हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात, पालक मदत करत आहेत. 

असे दिले जाते शिक्षण 

पालक विद्यार्थ्यांचा दिलेला अभ्यास करून घेतात. व्हॉट्सॲपमार्फत शिक्षकांना सेंड करतात. शिक्षक अभ्यास तपासून विद्यार्थ्यांना फोनवरून वैयक्तिक मार्गदर्शन करतात. शाळेतील चारही शिक्षकांनी वर्गनिहाय व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. रोज नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर अभ्यास दिला जातो. शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ, यू-ट्यूबवरील व्हिडिओ, दीक्षा ॲपमधील व्हिडिओ हे विद्यार्थ्यांना घटकानुसार सेंड केली जातात. विद्यार्थी त्यांचा अभ्यास करतात. केलेला अभ्यास छायाचित्र काढून किंवा केलेल्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ तयार करून शिक्षकांना व्हॉट्सॲपद्वारे शेअर करतात. 

वेताळबाबा मंदिरात वर्ग 

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामागील वस्तीत वेताळ बाबाच्या मंदिरात माजी विद्यार्थी रवींद्र चारोस्कर, कोमल वागले पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. शारीरिक अंतर ठेवून मास्क लावून वरील वर्गातील विद्यार्थी अध्यापन करतात. बर्वे वस्तीतील माजी विद्यार्थी अजिंक्य पगारे, बर्वे आजी परिसरातील वस्तीतील पहिलीतील पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना समाज मंदिरात अध्यापन करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com