शहरात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे ३४ जणांची तपासणी; वाचा सविस्तर

विक्रांत मते
Tuesday, 15 September 2020

ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारण्यात आली त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली.

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असताना महापालिकेने तपासणी मोहिमेला गती दिली त्यातून आतापर्यंत शहरात एक लाख ४७ हजार संशयितांची तपासणी करण्यात आल्यानंतर ३७ हजार ५८५ कोरोना बाधित आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक ३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार दोन लाख ४५ हजार ४६८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने आज पार पडलेल्या ऑनलाईन महासभेत देण्यात आली. 

ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारण्यात आली त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली. शहरात सहा एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला त्यानंतर एक लाख ४७ हजार ८१६ संशयित रुग्ण तपासण्यात आले. त्यात ३७ हजार ५८५ कोरोना बाधित आढळले तर १ लाख १३ हजार ८०८ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आढळले. शहरात आतापर्यंत सात हजार ९२४ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले तर सध्या १,९८० प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात आहे. शहरातील साडेचार लाख घरांमधील १५ लाख ७१ हजार १९१ नागरिकांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. तपासणी करताना प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह या प्रकारच्या आजरांच्या रुग्णांचा डाटा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

कोरोना लढाईचे वास्तव 

- मिशन झिरो नाशिक अंतर्गत ७५ हजार नागरिकांची तपासणी. 
- मोहिमेत दहा हजार कोरोना बाधित रुग्ण सापडले. 
- ४,४४,९१५ नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप. 
- महापालिका व खासगी ३९ रुग्णवाहीकेतून ७ हजार रुग्ण दाखल. 
- १,६०,१६, २७० रुपये रक्कमेची लेखापरिक्षकांकडून वजावट. 
- शहरात ५७ कोविड सेंटर्स. 
- कोव्हीड सेंटर मध्ये १,७३५ बेड. 
- नवीन बिटको रुग्णालयात २०० पैकी शंभर बेड ऑक्सिजनसाठी 
- ४८ खासगी कोविड सेंटरमध्ये १,३३४ बेड. 
- खासगी सेंटर मध्ये ५७७ ऑक्सीजन बेड, २६३ आयसीयू बेड तर ६९ व्हेंटीलेटर्स. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

शहरात १३२ व्हेटींलेटर्स 
कोविड रूग्णालयात ६३० खाटा असून ३६५ ऑक्सीजन बेड, १०९ आयसीयू बेड व ६३ व्हेंटीलेटर्स आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५० खाटा, १०० ऑक्सीजन बेड, २० आयसीयू बेड व ९ व्हेंटीलेटर्स आहेत. नाशिक शहरात सरकारी व खासगी रुग्णालय मिळून एकूण ९४२ ऑक्सीजन बेड, ३५८ आयसीयू बेड व १३२ व्हेंटीलेटर्स सुविधा उपलब्ध आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examination of 34 people behind one corona positive patient in nashik marathi news