कोरोनाच्या प्रादुर्भावातही नागरीकांमध्ये नवरात्रीसाठी उत्साह; देवी मुर्ती ग्राहकांची संख्या मात्र रोडावली

युनूस शेख
Saturday, 17 October 2020

नवरात्रोत्सवा निमित्ताने सार्वजनिक मंडळांकडून देवी मूर्तीची प्रतिष्ठापन केली जाते. त्यानिमित्ताने मंडळांचे पदाधिकारी आणि नागरीकांनी सकाळपासून गर्दी केली होती. जगदंबा, शेरावली, कालिका माता, सप्तश्रृंगी माता, रेणूका माता अशा विविध देवींच्या आकर्षक मूर्ती विक्रीस आल्या होत्या.

जुने नाशिक :  नवरात्रोउत्सव निमित्ताने द्वारका भागातील देवी मूर्ती विक्री स्टॉलवर नागरीकानी सकाळपासून गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी देवी मूर्ती खरेदीसाठी आलेल्या नागरीकांमध्ये नवरात्रीच्या उत्साह दिसून आला. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनामुळे ग्राहकांची संख्या रोडावली. देवी मूर्ती विक्रीवर सुमारे ८० टक्के परिणाम झाल्याची माहिती विक्रेत्यानी दिली. 

मंडळांची संख्या घटली

नवरात्रोत्सवा निमित्ताने सार्वजनिक मंडळांकडून देवी मूर्तीची प्रतिष्ठापन केली जाते. त्यानिमित्ताने मंडळांचे पदाधिकारी आणि नागरीकांनी सकाळपासून गर्दी केली होती. जगदंबा, शेरावली, कालिका माता, सप्तश्रृंगी माता, रेणूका माता अशा विविध देवींच्या आकर्षक मूर्ती विक्रीस आल्या होत्या. साद्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय किचकट नियम करण्यात आल्याने सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या घटली आहे. त्यामुळे देवी मूर्तीना हवी तशी मागणी झाली नाही. अनेक विक्रेत्यांकडे बहुतांशी देवी मूर्ती विक्री वीना पडून होत्या.

मिळेल त्या किमतीत मूर्ती विक्री

प्रतिष्ठापनेचा दिवस असूनही अनेक स्टॉल निर्रमनुष्य बघावयास मिळाले. काही स्टॉलवर मात्र नागरीक मूर्ती खरेदी करताना दिसून आले. दरवर्षी ६०० ते ७०० मूर्तीची विक्री होत असत. यंदा मात्र १०० मूर्ती देखील विक्री झाल्या नसल्याचे विक्रेत्याने सांगीतले. देवी मूर्तींचा माल पडून राहून नुकसान होण्यापेक्षा मिळेल त्या किमतीत मूर्ती विक्री केली जात असल्याचेही विक्रेत्यानी सांगीतले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. विक्रेत्यानी त्यांच्या स्टॉलमध्ये गुगल आणि पे-फोनच्या माध्यमातून आॅनलाईन रक्कम घेण्याची सुविधा ग्राहकाना उपलब्ध करुन दिली होती. त्याचप्रमाणे कोरोना जागृतीपर संदेश स्टॉलमध्ये लावण्यात आले होते. सॅनिटाईझरचा वापर करण्यात आला. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

ग्रामिण भागातील ग्राहक ठरले तारणहार 

कोरोनामुळे देवी मूर्ती खरेदीस शहरातून हवी तशी मागणी झाली नाही. स्टॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर मूर्ती पडून होत्या. विशेषता मोठ्या मूर्ती विक्री झाल्या नाही. तर विक्रेत्याना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले असते. दुपारनंतर मात्र ग्रामिण भागातील मंडळ, नागरीकानी देवी मूर्ती खरेदी केल्याने विक्रेत्यानी समाधान व्यक्त केले. ग्रामिण भागातील नागरीकानी सांगीतल्या त्या भावात मूर्ती विक्री करुन होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे विक्रेत्याने सांगीतले. यंदाच्या वर्षी तेच खरे तारणहार ठरले. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement of Navratri among the citizens even during Corona nashik news